लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
अ.नगर: ओबीसी आरक्षण व विविध मागण्यांसाठी मागील चार
दिवसांपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गोर सेना, नगर जिल्हा यांच्या वतीने साखळी
उपोषण सुरू करण्यात आले होते, प्रशासनाने लेखी आश्वासन
दिल्यानंतर मागे घेण्यात आले.
स्थानिक
स्वराज्य संस्थेमध्ये धोक्यात आलेले ओबीसीचे राजकीय आरक्षण अबाधित रहावे, यासाठी राज्य शासनाने तत्काळ
कारवाई करावी, मागासवर्गीय अधिकारी व कर्मचारी यांना
पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करावे, ओबीसी जातीनिहाय जनगणना
करावी, नवी मुंबई विमानतळास वसंतराव नाईक यांचे नाव द्यावे,
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे संयुक्त पूर्व परीक्षेचे वेळापत्रक
तात्काळ जाहीर करावे, बार्टीच्या धर्तीवर सारथीप्रमाणे
महाज्योतीला 3 हजार करोड रुपये निधी उपलब्ध करून द्यावा,
वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना करून जिल्हाध्यक्षांची
तात्काळ नेमणूक करावी, 1 नोव्हेंबर 2005 पासून सेवेत असलेल्या कर्मचार्यांना सेवानिवृत्त अधिनियम 1982-84 ची जुनी पेन्शन योजना लागू करावी, यांसह इतर विविध
मागण्यांसाठी हे उपोषण सुरू करण्यात आले होते. हे उपोषण प्रशासनाने लेखी आश्वासन
दिल्यानंतर मागे घेण्यात आले.
गोर
सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात
आलेल्या साखळी उपोषणात उपाध्यक्ष अशोक चव्हाण, विजय चव्हाण,
शाहूराव राठोड, प्रकाश राठोड, रमेश राठोड, बाबूराव चव्हाण, अंकुश
राठोड, मोहन राठोड, रमेश राठोड,
दिनकर राठोड, प्रकाश चव्हाण, मोहन पवार आदींसह समाज बांधव पारंपरिक वेशात मोठ्या संख्येने सहभागी झाले
होते.
यावेळी
जिल्हाध्यक्ष प्रसाद राठोड म्हणाले की, गोर सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. संपत चव्हाण
यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरातील 25 जिल्ह्यांत एकाच
वेळी विविध मागण्यांच्या सोडवणुकीसाठी साखळी उपोषण मागील 4 दिवसांपूर्वी
सुरू करण्यात आले होते. प्रशासनाने साखळी उपोषणाची दखल घेत विविध मागण्यांची
पूर्तता व्हावी, यासाठी राज्य सरकारला कळविले आहे.
0 टिप्पण्या