Ticker

6/Breaking/ticker-posts

रविंद्र जडेजाचा अनोखा विक्रम; दिग्गज खेळाडूंच्या पंक्तित मिळाले स्थान

 






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

नवी दिल्ली: इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटीवर भारताने पकड मिळवली आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील या पहिल्या लढतीत भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने अनोखा विक्रम स्वत:च्या नावावर केलाय. भारताच्या पहिल्या डावात जडेजाने कसोटी करिअरमधील १६ अर्धशतक झळकावले. या खेळीमुळे जडेजाने दिग्गज खेळाडूंच्या पंक्तित स्थान मिळवले आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये २ हजार धावा आणि २०० विकेट घेणारा काही मोजक्या खेळाडूमध्ये आता जडेजाचा समावेश झाला आहे. भारताकडून याआधी अशी कामगिरी कपिल देव, आर अश्विन, अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग यांनी केली आहे. कसोटीत वेगाने अशी कामगिरी करणारा जगतिक क्रिकेटमधील तो पाचवा खेळाडू आहे. त्याने ५३व्या कसोटी ही कामगिरी केली.


कसोटीत २ हजार धावा आणि २०० विकेट सर्वात वेगाने घेण्याचा विक्रम इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू इयान बॉथम यांच्या नावावर आहे. त्यांनी ४२ कसोटीत अशी कामगिरी केली होती. त्यानंतर कपील देव यांचा क्रमांक लागतो. त्यांनी ५० कसोटीत तर पाकिस्तानचा माजी कर्णधार इमरान खान यांनी देखील ५० कसोटीत अशी कामगिरी केली होती. भारताचा फिरकीपटू आर अश्विन ने ५१ कसोटी असा कमाल केला होता.

पहिल्या कसोटी भारताच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडचा पहिला डाव १८३ धावात संपुष्ठात आला. भारताने पहिल्या डावात २७८ धावा करून महत्त्वाची आघाडी घेतली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडने विकेट न गमावता २५ धावा केल्या होत्या. ते अद्याप ७० धावांनी पिछाडीवर आहेत.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या