Ticker

6/Breaking/ticker-posts

राज्यात ब्रेकनंतर पुन्हा कोसळणार दमदार पाऊस; ४-५ दिवसांत कमबॅक

 








लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

मुंबई : राज्यात महापुराच्या परिस्थिती नंतर दडी मारलेल्या पावसाने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवलं. पण आता मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाच्या मुंबई येथील प्रादेशिक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार पुढील चार ते पाच दिवसांनी मध्ये राज्यात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे.

ज्येष्ठ हवामान तज्ञ के.एस. होसाळीकर यांनी यासंबंधित ट्वीटदेखील केलं आहे. राज्यात येत्या चार ते पाच दिवसांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. यातही जर मुसळधार पाऊस झाला तर शेतकऱ्यांना पिक टिकवण्याचं संकट असणार आहे.

खरंतर, गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई, कोकण, विदर्भ आणि सर्वदूर भीषण परिस्थिती ओढावली होती. मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. पण सध्या जिल्ह्यांमध्ये पावसाने दडी मारली आहे. पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस सुरू आहे.

वामान खात्याने 15 ऑगस्टनंतर पुन्हा एकदा राज्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. राज्यात सर्वदूर पाऊस होणार अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. इतकंच नाही तर कोकणामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि यावेळी विदर्भ आणि मराठवाडामध्ये चांगला पाऊस होईल असा हवामान खात्याने म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या