लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
मुंबई: इंधन दरवाढ आणि महागाईमुळे अगोदरच
मेटाकुटीस आलेल्या सामान्य नागरिकांना आता सिलेंडर दरवाढीचा फटका बसला आहे.
त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. या सर्वांतच खासदार
नवनीत राणा यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. इंधन दरवाढीमुळे अक्षरश: सर्वसामान्यांचे
कंबरडं मोडलं आहे. आधीच खाद्य तेलाच्या आणि पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये वाढ
झाल्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. अशामध्ये पुन्हा एलपीजी सिलेंडरच्या
दरामध्ये वाढ झाली आहे.
सोशल मीडियावर सध्या राणा यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
त्यामध्ये त्या चुलीवर स्वयंपाक करताना दिसत आहेत.
‘ घरगुती गॅस सिलेंडरचे प्रचंड दर
वाढल्याने खासदार नवनीत राणांनी चुलीवर स्वयंपाक करून मोदी सरकारचा निषेध’ अशी कॅप्शन दिली आहे. राणा यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत
आहे. सरकारी तेल कंपन्यांनी १ ऑगस्टपासून गॅस सिलेंडरच्या किमतीत 73.5
रुपयांनी वाढ केली आहे. ही वाढ कमर्शियल गॅस सिलेंडरच्या दरात
आहे. या महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती स्थिर आहेत.
एप्रिल महिन्यात
घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 10 रुपयांनी घट करण्यात आली होती. मे
आणि जून महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झाला नव्हता. जुलै
महिन्यात प्रति सिलेंडर 25.50 रुपयांनी वाढ करण्यात आली
होती. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात 73.5 रुपयांनी वाढ करण्यात
आली आहे. आधीच महागाई आणि त्यात सततच्या सिलेंडर दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता
चांगलीच त्रस्त झाली आहे.
एलपीजी
किंमत अशी तपासा ?
एलपीजी
सिलिंडरची किंमत तपासण्यासाठी तुम्हाला सरकारी तेल कंपनीच्या संकेतस्थळावर जावे
लागेल. येथील कंपन्या दरमहा नवीन दर जारी करतात. (https://iocl.com/Products/IndaneGas.aspx)
या संकेतस्थळावर आपण आपल्या शहरातील गॅस सिलिंडरची किंमत तपासू
शकता.
0 टिप्पण्या