Ticker

6/Breaking/ticker-posts

शेवगाव इनरव्हील क्लबकडून पूरग्रस्त चिपळूणकरांना मदतीचा हात.












लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


शेवगाव : गेल्या काही दिवसांत सातत्याने पडत असलेला पाऊस, आणि त्यामुळे कोसळणाऱ्या दरडी, नद्यांना येणारे महापूर, आणि या समस्यांनी ग्रस्त असलेला कोकण परिसर. हे आपण रोज बातम्यातून पाहत आहोत. 
 नैसर्गिक संपत्तीने नटलेल्या या कोकनाचे यंदाच्या पावसाळ्यात मात्र भितीदायक रूप दिसू लागले. यात कित्येकांना आपले जीव गमवावे लागले. तर कित्येकांचे संसार पाण्यात तरंगू लागले. यात चिपळूणकरांना जबरदस्त फटका बसला. गेल्या दोन वर्षापासून कोरोना चा सामना करत असताना यात आणखी मोठ्या संकटाची भर पडल्याने चिपळूणकर हवालदिल झाले. 
     या सर्व कठीण काळात चिपळूणकरांना सरकारसह अनेक सामाजिक संस्थांनी मदतीचा हात दिला. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव शहरातूनही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तालुका अध्यक्ष गणेश रंधावणे यांनी मदतीचे आवाहन केले होते. त्यास इनरव्हिल क्लब परिवाराने साथ देत मोलाची मदत केली. सध्या स्नेहालयची मिशन राहत टीम चिपळूण मध्ये उपस्थित असून राहत कार्य करत आहे. तिथे प्रमुख्याने चिपळूणकर विजेच्या समस्येस तोंड देत असल्याने, मेणबत्ती, माचिस, मच्छर अगरबत्ती, कपडे, रग आदी साहित्य इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा डॉ.मनीषा लड्डा, सेक्रेटरी सौ.अनुजा लड्डा, श्रीमती वसुधा सावरकर, सौ. रुपाली तडवळकर, सौ. स्नेहल लाड व सर्व इनरव्हील परिवार यांच्या वतीने देण्यात आले.

या सर्व उपक्रमाचे आयोजन स्नेहालय- उचल फाउंडेशन संचलित स्व. बाबासाहेब खेडेकर विद्यार्थी वसतिगृह येथे करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मुख्य विद्युत अभियंता श्री. तायडे साहेब यांनी  उचल फाऊंडेशनच्या गरजा व समस्या समजून घेताना विजेच्या संदर्भात असलेला मुख्य प्रश्न मार्गी लावला. यात यापूर्वी संस्थेचे थकलेली वीज बिल त्यांनी स्वतः भरून यापुढील येणारे विजबिल सुद्धा ते स्वतः भरणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच श्रीमती स्नेहलता लबडे यांनीही पूरग्रस्तांबरोबरच उचल फाउंडेशन साठीही एक महिन्याचा किराणा सहयोग दिला.

याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सुनील रासने, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हा अध्यक्ष गोकुळ भागवत, तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे, उपाध्यक्ष संजय वनवे, विद्युत मंडळाचे मुख्य अभियंता तायडे साहेब,श्री. नितीन जाधव,  देविदास हुशार सोमनाथ आधाट इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते. 
या सर्व उपस्थितांचे  इनरव्हील क्लब आणि उचल फाउंडेशन च्या वतीने सचिन खेडकर व स्वाती ढवळे यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या