Ticker

6/Breaking/ticker-posts

शशी थरूर यांचं 'ओणम' सेलिब्रेशन आणि सोशल मीडियावर 'मिम्स'

 








लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार शशी थरूर सोशल मीडियावर बरेच अॅक्टिव्ह दिसतात. काही दिवसांपूर्वी दक्षिण भारतात साजऱ्या केल्या जाणाऱ्या 'ओणम' सणाच्या निमित्तानं शशी थरूर यांनी आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. यानंतर मात्र, सोशल मीडियावर 'मिम्स'चा पाऊस पडलेला दिसून येतोय.

शशी थरूर यांचे ओणम सेलिब्रेशनचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरलल झालेले दिसत आहेत. अनेक नेटकरी या फोटोंची मजाही घेत आहेत. तर काही जण मिम्सच्या माध्यमातून आपली कलात्मकता जगासमोर उघड करत आहेत.

शशी थरूर यांनाही नेटकऱ्यांची ही कलात्मकता भावलेली दिसून आलीय. आपल्यावर तयार करण्यात आलेल्या मिम्सला त्यांनीही हसत-खेळत शेअर केलंय.

या मिम्समध्ये शशी थरुर कुठे क्रिकेटच्या मैदानात दिसत आहेत तर कधी ऑलिम्पिकच्या खेळांत... तर कधी फक्कड चहा बनवताना... एका फोटोत तर ते चक्क भरतनाट्यम करताना दिसत आहेत. तर एका फोटोत शशी थरूर यांचा पुतळ्याला 'स्टॅच्यु ऑफ डिक्शनरी' असंही कॅप्शन देण्यात आलंय.

सोशल मीडियावरचे आपले मिम्स फेसबुकवर शेअर करताना 'यातील अनेक मिम्समध्ये माझा नारळ फोडतानाचा फोटो आहे. मला माहीत नाही कोण अशी स्वप्नरंजन करतं परंतु, अनेकदा हे मिम्स मजेशीर असतात. यातील हे माझे काही आवडते मिम्स' असं शशी थरुर यांनी म्हटलंय.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या