Ticker

6/Breaking/ticker-posts

'त्या' चेकचे पुढे काय झाले?; मुख्यमंत्र्यांना 'या' नेत्याने विचारला सवाल

 

लसखरेदीसाठी तयार ठेवलेला चेक कुठे आहे?

राधाकृष्ण विखे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सवाल.










लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

नगर: केंद्राने कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करून द्यावी. आम्ही ती एक रकमी खरेदी करू. त्यासाठीचा चेकही तयार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. आता केंद्र सरकारने सर्वांना मोफत लस उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या त्या चेकचं पुढे काय झालं, तो चेक कुठे आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे, असे नमूद करत माजी मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटलांनी निशाणा साधला. केंद्रीने लसीकरणाची जबाबदारी घेतल्याने वाचलेल्या या रकमेतून राज्य सरकारने जनहिताची अन्य कामे करावीत, असा सल्लाही विखे पाटील यांनी दिला.

विखे पाटील म्हणाले, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली होती की, राज्यात आम्ही एका धनादेशावर लस खरेदी करण्यासाठी तयार आहोत. पण आता राज्य सरकारचा हा धनादेश आणि लस कुठे गेली हे शोधण्याची वेळ आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोफत लस उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे राज्य सरकारचे मोठ्या प्रमाणात पैसे वाचले आहेत. आता लसीकरणाचा वाचलेला पैसा राज्य सरकारने सर्वसामान्य लोकांसाठी खर्च करावा. करोना सारख्या भीषण संकटाला देश सामोरा जात असताना पंतप्रधान मोदी यांनी देशातील सामान्य माणसांच्या हिताचे निर्णय घेतले. सुमारे ४५ कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण करणारा भारत देश जगात अग्रेसर ठरला आहे. लसीकरणासाठी ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद केंद्र सरकारने केली आहे,’ असंही विखे पाटील यांनी सांगितलं.

राज्य सरकारवर टीका करताना विखे पाटील म्हणाले, ‘मागील दोन वर्षांत राज्य सरकारचा कोणताही आधार सामान्य माणसाला मिळालेला नाही. याउलट केंद्र सरकराने १४ हजार खोटी रुपयांच्या अनुदानाची तरतूद करून खतांचे भाव स्थिर ठेवले. वैद्यकीय शिक्षणासाठी ओबीसींसाठी २७ टक्के आणि अर्थिक दुर्बल घटकांसाठी १० टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सामान्य विद्यार्थ्यांना आता वैद्यकीय शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे.

आदिवासी कुटुंबीयांना खावटी कर्ज योजनेतून मंजूर झालेल्या किराणा किटचे वितरण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. आदिवासी प्रकल्प अधिकारी संतोष ठुबे, सहायक प्रकल्प अधिकारी सुनील बारसे, भाजपचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, उपाध्यक्ष रघुनाथ बोठे, नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, सभापती भाऊसाहेब जेजूरकर यावेळी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या