Ticker

6/Breaking/ticker-posts

राज्यातील निर्बंध हटवणार ? राजेश टोपेंनी दिले संकेत

 

*राज्यातील करोना रुग्णांची संख्या आटोक्यात

*राज्यातील कठोर निर्बंध हटवणार आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिले संकेत








लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 जालनाः राज्यात निर्बंध हटवण्यासंदर्भात संपूर्ण गृहपाठ झाला असून टास्क फोर्स, आरोग्य विभाग व आपत्ती निवारण यंत्रणेसह सर्वांची मते आली आहे. याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच निर्णय घेतील, असं संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले.


करोनाच्या कठोर निर्बंधांमुळं अडचणीत सापडलेल्या नागरिकांना लवकरच राज्य सरकारकडून दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. राज्यातील करोना कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध शिथिल करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी टास्क फोर्सबरोबर केलेल्या चर्चेनंतर आज निर्बंध शिथिल करण्याबाबतचे आदेश काढण्याची शक्यता आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही निर्बंध शिथिल होण्याबाबत आदेश दिले आहेत.

राज्यातील करोना बाधितांची संख्या नियंत्रणात आहे. गेल्या दीड महिन्यांपासून ५ ते ७ हजारांच्या दरम्यान रुग्णसंख्या स्थिर आहे. करोनाबाधितांचा आकडा रोज खाली येतोय. राज्यातील करोना रुग्णांची संख्या स्थिर ठेवण्यासाठी नागरिकांनी करोनाचे नियम पाळावे. तसंच, लसीकरणाला प्राधान्य द्या, असंही राजेश टोपेंनी म्हटलं आहे. लसीकरणामुळं रोग प्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळं जरी करोनाचा संसर्ग झाला तरी मृत्यू टाळता येतो. लसीबाबत ग्रामीण भागात अनेक गैरसमज आहेत. ते दूर करुन नागरिकांनी लसीकरणासाठी पुढं यावं, असं आवाहन राजेश टोपेंनी केलं आहे.

पुणे जिल्हयातील पुरंदर तालुक्यात 'झिका'चा रुग्ण आढळला आहे. त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही. या आजाराच्या रुग्णामध्ये जी लक्षणं आढळली आहे. त्यानुसार उपचार केले जात आहेत. साठलेल्या पाण्यावर एडीस प्रजातींच्या डासांची उत्पत्ती होते. त्यांची उत्पत्ती होऊ नये म्हणून आवश्यक पावलं उचलून सर्वेक्षण करण्याचे आदेश आरोग्य विभागाला देण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय.

पावसाळा सुरू झाल्यावर पाणी साचते त्यामुळे डेंग्यू ,चिकनगुनिया सारखे साथीचे आजार पसरू शकतात. म्हणून सर्वांनी स्वच्छतेवर भर द्यावा, प्रतिबंधात्मक उपाय करावे. राज्याचाआरोग्य विभाग याबाबत योग्य कारवाई करेल, असंही ते म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या