Ticker

6/Breaking/ticker-posts

आखाड जोरात ! पार्टिसाठी चोरल्या चक्क वीस गावरान कोंबड्या..

 








लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

हडपसरः आखाड महिन्याच्या शेवटच्या रविवारी मोठ्या प्रमाणात मासांहर केला जातो. मात्र, आखाडी साजरी करण्यासाठी एकानं थेट कोंबड्यांचीच चोरी केली आहे. हडपसर हिंगणेमळा येथे हाजी चिकन शॉप शेजारील एका पिंजऱ्याचे कुलूप तोडून तब्बल वीस गावरान कोंबड्या चोरीला गेल्याचा प्रकार घडला आहे. आखडीसाठी चक्क कोंबड्या चोरल्याने हडपसर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

रविवारी पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास हिंगणेमळा याठिकाणी ही घटना घडली आहे. शॉप मालक अस्लम इस्माईल शेख यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आज रविवार असल्याने गावरान कोंबड्या विक्रीसाठी कालच पिंजऱ्यात आणून ठेवल्या होत्या. मात्र सकाळी दुकान उघडले आणि शेजारील पिंजऱ्यात पाहिले तर कोणी तरी पिंजऱ्याचे कुलूप तोडून आत मधून कोंबड्या चोरल्याचे समजले. रविवारी चिकनसाठी लोकांची गर्दी असते. मात्र कोंबड्याच चोरीला गेल्यानं मालकाला मोठं नुकसान सहन करावा लागलं आहे.

कोंबड्याचं चोरीला गेल्यानं मालकाला डोक्याला हात लावून बसायची पाळी आली होती. दुकानाशेजारील योगेश हिंगणे यांनी याबाबत दुकानाच्या समोर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात पाहिले असता तीन अज्ञात इसम गाडीवरून येऊन कुलूप तोडून पोत्यामध्ये कोंबड्या भरून हडपसरच्या दिशेने गेल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्याचे दिसल्यानंतर हडपसर पोलीस ठाण्यात पाचशे रुपयाच्या वीस कोंबड्या चोरीला गेल्याची तक्रार दिली आहे. माझी गरिबी परिस्थिती आहे, कोंबड्याचा शोध घेऊन मला द्यावेत, अशी विनंती मालक अस्लम शेख यांनी तक्रारी अर्जातून केली आहे. याबाबत हडपसर तपास विभागाचे पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या