लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
मुंबई : बिग बॉस हा रिअॅलिटी शो कोणत्या ना कोणत्या
कारणावरून कायमच चर्चेत असतो. सध्या हा कार्यक्रम वूट या ओटीटी प्लॅटफॉर्मवरून
प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या स्पर्धकांमुळे सध्या हा
कार्यक्रम चर्चेत आहे. आता या बिग बॉस ओटीटीशी संबंधित मोठी बातमी आली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निर्माते लोकप्रिय आणि चिरतरुण अभिनेत्री रेखा यांना सहभागी करून घेणार आहेत. इतकेच नाही
तर रेखा यांच्याकडे निर्माते महत्त्वाची जबाबदारी सोपवणार आहेत. रेखा बिग बॉसमध्ये
ट्री ऑफ फॉर्च्यूनच्या रुपात येणार आहेत.
या कारणामुळे रेखा दिसणार बिग बॉसमध्ये
रेखा आता सिनेमांपासून दूर आहेत. परंतु तरी देखील
त्या हिंदी सिनेमासृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांच्या येण्यामुळे
रिअॅलिटी कार्यक्रमाची लोकप्रियता वाढते. काही दिवसांपूर्वी रेखा इंडियन आयडल आणि
डान्स दिवाने ४ या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. आता त्या बिग बॉस
कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात त्यांची इंट्री एका खास कारणासाठी
होणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रेखा ट्री ऑफ फॉर्च्यून म्हणून
कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यामध्ये त्यांच्याकडे बिग बॉस ओटीटी मधील स्पर्धकांना बिग बॉस १५ च्या घरात प्रवेश करणाऱ्या स्पर्धकांची सलमान खानला ओळख करून द्यायची आहे.
बिग बॉस ओटीटी सहा आठवडे चालणार
बिग बॉस ओटीटी हा कार्यक्रम सहा आठवडे चालणार आहे.
या कार्यक्रमाचा एक आठवडा पूर्ण झाला आहे. पहिल्या आठवड्यातच उर्फी जावेद बाहेर
गेली. तर दुसऱ्या आठवड्यातही पहिल्या आठवड्याप्रमाणे गोंधळ सुरू आहे. सहा
आठवड्यांमध्ये या कार्यक्रमात जे स्पर्धक राहतील त्यांना बिग बॉस १५ मध्ये सहभागी
करून घेतले जाणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलमान खान करणार आहे.
0 टिप्पण्या