Ticker

6/Breaking/ticker-posts

'सिंधू भारताचा गर्व आहे' सिंधूवर शुभेच्छांचा वर्षाव..!

 









लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

टोकियो : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला तिसरं पदक मिळवून देणाऱ्या सिंधूवर शुभेच्छांचा वर्षाव होण्यास सुरवात झाली आहे. भारताचे प्रथम नागरिक राष्ट्रपती रामनाथ कोविंद शुभेच्छा देण्यातही पहिले आले आहेत. त्यापाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी, माजी केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगन मोहन रेड्डी, परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर तसेच अनेक राजकीय तसेच क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींनी सिंधूचं अभिनंदन करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

ष्ट्रपती म्हणाले की, 'सिंधूने सातत्य, समर्पण आणि उत्कृष्टतेचे नवीन मापदंड प्रस्थापित केला आहे. ऑलिम्पिक खेळामध्ये दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली. भारताचा गौरव वाढविल्याबद्दल तिचे अभिनंदन.'

पंतप्रधान मोदी म्हणाले, 'सिंधूच्या तारांकित कामगिरीमुळे आम्ही सर्वजण आनंदी आहोत. ती भारताची शान आणि सर्वात उत्कृष्ट ऑलिम्पिकपटू आहे. कांस्य पदक जिंकल्याबद्दल तिचे अभिनंदन.'

काँग्रेस नेते राहुल गांधींनी सिंधूच्या विजयाबद्दल तिचे अभिनंदन केले आहे. भारतासाठी कांस्य जिंकल्याबद्दल आमच्या तेलुगू मुलीला शुभेच्छा आणि खूप खूप अभिनंदन, अशा शब्दांत जगन मोहन रेड्डींनी सिंधूला शुभेच्छा दिल्या आहेत.

परराष्ट्रमंत्री जयशंकर म्हणाले की, 'सिंधूला पाहून आनंद झाला. भारतासाठी दुसरं पदकं घरी आणलं. या भव्य यशाबद्दल तिचं अभिनंदन.' तर माजी केंद्रीय क्रीडा मंत्री रिजिजू म्हणाले की, टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे तिसरे पदक... कांस्य पदक जिंकल्याबद्दल तुमचा खूप अभिमान आहे. वैयक्तिक दुसरं पदक जिंकत भारताला अभिमानित केलं.

भारताचा महान फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने देशाला खूप अभिमानास्पद अशी कामगिरी केल्याबद्दल सिंधूचे अभिनंदन केले आहे. ' ईसायी, मुस्लीम, सीख, हिंदू, सबको जोडे पी.व्ही.सिंधू. दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारी भारताची पहिली महिला खेळाडू. खूप अभिनंदन,' असे भारताचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने म्हटले आहे. तसेच व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, दिनेश कार्तिक आणि शिखर धवन यांनीही सिंधूचे अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या