Ticker

6/Breaking/ticker-posts

म्हणून आहे ..५ ऑगस्ट खास ... ऐका पंतप्रधान मोदींच्या तोंडून !

 *५ ऑगस्ट २०१९... जम्मू काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवले

*५ ऑगस्ट २०२०... राम मंदिर भूमिपूजन

*५ ऑगस्टे २०२१... ऑलिम्पिकमध्ये हॉकी पुरुष संघानं कांस्य पदक पटकावलं









 लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

नवी दिल्ली : भारताल हॉकी मेडल मिळालं, राम मंदिराच्या निर्माणाच्या कामाला सुरूवात झाली आणि अनुच्छेद ३७० हटवण्यात आले ... या तिन्ही गोष्टी एकाच तारखेला ५ ऑगस्ट रोजी घडल्या... असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५ ऑगस्ट ही विशेष तारीख ठरल्याचं म्हटलंय.

' पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजने'बद्दल जागरुकता फैलावण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदीं बोलत होते.

आज ५ ऑगस्ट ही तारीख खूपच विशेष ठरलीय. ही ५ ऑगस्टच तारीख आहे, जेव्हा दोन वर्षांपूर्वी देशानं 'एक भारत, श्रेष्ठ भारत' भावनेला आणखीन सशक्त केलं. ५ ऑगस्ट रोजच जम्मू काश्मीरच्या प्रत्येक नागरिकाला प्रत्येक अधिकार, प्रत्येक सुविधा मिळवून देण्यासाठी अनुच्छेद ३७० हटवण्यात आला... ती ५ ऑगस्ट हीच तारीख आहे जेव्हा कोट्यवधी भारतीयांनी शेकडो वर्षानंतर भव्य राम मंदिर निर्माणाकडे पहिलं पाऊल टाकलं. आज अयोध्येत तेजीनं राम मंदिराच्या निर्माणाचं काम सुरू आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय.

जवळपास चार दशकांनंतर हा सुवर्ण क्षण आला आहे. आपली राष्ट्रीय ओळख असलेल्या 'हॉकी'ला आपल्या तरुणांनी पुन्हा एकदा गौरवान्वित करून देशाला मोठा उपहार दिला आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलंय.

यावेळी, मोदींनी संसदेचं कामकाज न चालल्याचं खापर विरोधकांवर फोडत निशाण्यावर घेतलं. 'एकीकडे आपला देश, आपले तरुण भारतासाठी नव्या सिद्धी प्राप्त करत आहेत. विजयाचा गोलावर गोल करत आहेत. तर दुसरीकडे असेही काही लोक आहेत जे राजकीय स्वार्थापोटी एकप्रकारे सेल्फ गोल करत आहेत. देशाला काय प्राप्त करतोय, याच्याशी त्यांचं काहीही देणं-घेणं नाही', असं म्हणत त्यांनी विरोधकांवर टीका केलीय.

विरोधक भारताच्या संसदेचा वारंवार अपमान करत आहेत. देशाचा प्रत्येक नागरिक मानवतेवर कोसळलेल्या संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत असताना हे लोकांत देशहिताची काम रोखण्याची स्पर्धा लागलीय, असात आरोपही पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर केलाय.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या