Ticker

6/Breaking/ticker-posts

भारत आणि अफगाणिस्तानात कोणकोणत्या वस्तूंची आयात-निर्यात होते? जाणून घ्या.



 





लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

नवी दिल्ली : अफगाणिस्तानातील सत्ता आपल्या ताब्यात घेतल्यानंतर तालिबान्यांनी आपल्या धोरणानुसार, नियम आणि कायदे लागू करणं सुरू केलंय. अफगाणिस्तानात उद्भवलेलं राजकीय संकट अमेरिकाभारत ,पाकिस्तान सहीत जगातील अनेक देशांसाठी धोक्याची चिन्हं दर्शवत आहेत. याच पार्श्वभूमीवर देशातील सुरक्षा यंत्रणा आणखीनच अलर्ट झाल्या आहेत. अफगाणिस्तानात उद्भवलेल्या राजकीय संकटात भारताला वेगवेगळ्या पातळ्यांवर धोका आधीच ओळखावा लागणार आहे तसंच सतर्क राहावं लागणार आहे, हे स्पष्टपणे दिसून येतंय. अफगाणिस्तानात उद्भवलेल्या अंदाधुंदी कारभाराचा परिणाम दोन्ही देशांच्या व्यापारावर होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

भारत आणि अफगाणिस्ताना दरम्यान व्यापारी संबंध खूप वर्षांपूर्वीपासून प्रस्थापित झाले आहेत. परंतु, सध्याची परिस्थिती पाहता दोन्ही देशांदरम्यान आयात  निर्यातीवर परिणाम दिसून येऊ शकतो. या परिणामांचा विचार करण्यासाठी भारत आणि 

अफगाणिस्ताना दरम्यान कोणकोणत्या वस्तूंची आयात – निर्यात  होते, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

अफगाणिस्तानातून भारतात होणारी आयात

अफगाणिस्तानातून भारतात अनेक गोष्टींची आयात केली जाते. या यादीत ड्राय फ्रूटसची संख्या सर्वाधिक आहे. अफगाणिस्तानच्या उत्पादनांसाठी दक्षिण आशियातला सर्वात मोठा ग्राहक म्हणजे भारत आहे. अफगाणिस्तानातून भारतात मोठ्या प्रमाणात सुका मेवा आणि फळं आयात केली जातात.

अफगाणिस्तानातून भारतात मनुके, अक्रोड, बदाम, अंजीर, पाइन नट, पिस्ता, सुक्या जर्दाळू अशा सुक्या मेव्याची आयात केली जाते. त्याचसोबत डाळिंब, सफरचंद, चेरी, खरबूज, टरबूज तसंच हिंग, जिरे यांसारखे मसाले तसंच केसर यांचीही अफगाणिस्तानातून भारतात आयात केली जाते.

यांशिवाय औषधी वनस्पतींचीही अफगाणिस्तानातून भारतात आयात होते. भारत आणि अफगाणिस्तानच्या सीमा जवळ असल्यानं आयात निर्यातीसाठी कमी वेळ लागतो.

भारतातून अफगाणिस्तानात निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तू

भारतातून अफगाणिस्तानला चहा आणि कॉफीची निर्यात मोठ्या प्रमाणावर केली जाते. याशिवाय कापूस, काळे मिरेही भारतातून अफगाणिस्तानात जातात. याशिवाय भारताकडून अफगाणिस्तानात हजारो कोटींच्या योजनांची गुंतवणूक करण्यात आलीय. यातील अनेक योजनांवर अद्याप काम सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या