लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
सोलापूर
: जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय विभागात विविध पदांची भरती केली
जाणार आहे. याअंतर्गत ग्रामीण आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण
३३४ जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी लागणारी शैक्षणिक आर्हता, अनुभव, वयोमर्यादा, पगार यांचा
सविस्तर तपशील अधिकृत वेबसाइटवरील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. यासाठी
उमेदवारांकडून
ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले
आहेत.
या भरती अंतर्गत खेळाडू, माजी सैनिक, महिला,
प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यांना सरकारी
नियमानुसार सवलत मिळणार आहे. निवड झालेल्या उमेदवाराला सातव्या वेतन श्रेणीनुसार
पगार मिळणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.
उमेदवार दिनांक १ ते
२१ सप्टेंबर २०२१ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात. मार्च २०१९ च्या जाहिरातीनुसार
ऑनलाइन परीक्षेकरीता उमेदवाराला एकापेक्षा अधिक जिल्हा परिषदांच्या परीक्षेसाठी
अर्ज करण्याची मुभा होती. पण शासनाचे महापरीक्षा पोर्टल रद्द झाल्याने परीक्षा OMR
Vendor मार्फत ऑफलाइन पद्धतीन होणार आहे. या परीक्षा सर्व जिल्हा
परिषदांमार्फत एकाच दिवशी होणार आहेत. त्यामुळे उमेदवाराला एकाच जिल्हा परिषदेतून
परीक्षा देता येईल.
पर्याय निवडताना काही अडचण आल्यास
उमेदवारांना ७२९२००६३०५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भरती प्रक्रियेमध्ये आवश्यकतेनुसार महत्वाचे बदल करण्याचे अधिकार शासनाकडे आहेत.
0 टिप्पण्या