Ticker

6/Breaking/ticker-posts

कुस्तीत रवीकुमाने इतिहास घडवला ; ऑलिम्पिकमध्ये भारताला आणखी एक रौप्य

 







लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

टोकियो: भारताचा कुस्तीपटू रवी कुमार दहिया याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकून इतिहास घडवला. टोकियो ऑलिम्पिकमधील भारताचे हे दुसरे रौप्यपदक आहे. याआधी भारताला मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य, पीव्ही सिंधूने बॅडमिंटनमध्ये कांस्य, बॅक्सिंगमध्ये लव्हलिना बोर्गोहाने हिने कांस्य पदक जिंकून दिले होते. तर आज (५ ऑगस्ट) सकाळी भारताच्या पुरुष हॉकी संघाने कांस्यपदक जिंकले होते.

कुस्तीत फ्रीस्टाइलमध्ये ५७ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत रशियाच्या झावूर युगूएवने भारताच्या रवी कुमारचा पराभव केला. पहिल्या फेरीनंतर रवी कुमार ४-२ असा पिछाडीवर होता. झावूरने प्रत्येकी एक असे दोन गुण मिळवले. त्यानंतर रवीने दोन गुण मिळून बरोबरी केली. तर झावूरने पुन्हा दोन गुणांची कमाई केली. त्यानंतर झावूरने आणखी ३ गुण मिळवत आघाडी ७-२ अशी केली. अखेर झावूने रवी कुमारवर ७-४ असा विजय मिळवला.

त्याआधी उपांत्य फेरीत रवीने कझाकिस्तानच्या नूरीस्लाम सनायेवचा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. ऑलिम्पिकमध्ये कुस्तीच्या अंतिम फेरीत जाणारा रवी हा दुसरा भारतीय होता. याआधी २०१२ मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये सुशीलकुमारने अंतिम फेरीत धडक मारली होती.

भारताने ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत आतापर्यंत पाच पदक जिंकली होती. यामध्ये खाशाबा जाधव यांनी १९५२च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये कांस्य, सुशीलकुमारने २००८च्या बिजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य तर २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले होते. योगेश्वर दत्तने लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकले. तर २०१६ रिओ मध्ये साक्षी मलिकने कांस्य पदक जिंकले होते. या यादीत आता रवी कुमारचा देखील समावेश झाला आहे.

कुस्तीमधील भारताची पदके

खाशाबा जाधव, कांस्य पदक- १९५२ हेलसिंकी ऑलिम्पिक

सुशीलकुमार,कांस्य पदक- २००८ बिजिंग ऑलिम्पिक

सुशीलकुमार,रौप्य पदक- २०१२ लंडन ऑलिम्पिक



योगेश्वर दत्त, कांस्य पदक-२०१२ लंडन ऑलिम्पिक

साक्षी मलिक, कांस्य पदक- २०१६ रिओ ऑलिम्पिक

रवीकुमार दहिया, रौप्यपदक २०२० टोकियो ऑलिम्पिक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या