Ticker

6/Breaking/ticker-posts

सारीरात पाऊस पण, घोटभरच पाणी ,ओढे नदी नाले कोरडी ठाक..!

  रिम झिम मुळे पिकाला तेवढं तुर्तास जिवदान ..









लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

खरवंडी कासार : रिमझिम पावसामुळे पिकाना तुर्तास जिवदान मिळाले असले तरी सारीरात पाऊस व घोटभर पाणी अशी गत झाल्याने ओढे तळे नदी नाले कोरडे ठाक पडले आहेत  अल्प पाऊस व ढगाळ वातावरणामुळे कपाशी व तुर पिकावर रस शोषक किड्याचा प्रादुर्भाव वाढल्याने  असल्याने शेतकरी चितांतुर आहे .


खरीपाची पेरणी झाल्या नतंर जोमदार पाऊस न आल्या ने मुग उडीद पिके वाया गेली आहेत उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट झाली आहे झालेला खर्च ही पदरात पडणार नाही . गेल्या पाच सहा दिवसा पासुन रिम झिम पावसामुळे तुर  कपाशी बाजरी मका पिकाना औट घटकेचे जिवदान मिळाले असले तरी जोरदार पाऊस नसल्याने हि पिके पदरात पडतीलच यांची शाश्वती नाही 


  जुणच्या पहिल्या आठवड्यात मान्सून पूर्व पावसाने परीसरात बर्‍यापैकी हजेरी लावल्यानंतर मृग नक्षत्राच्या पहिल्या चरणात पावसाला अनुकूल असे आल्हाददायक वातावरण निर्माण झाल्याने आनंदीत झालेला बळीराजा ने आनंदा मध्ये खरीप  पेरणी केली  कपाशी तुर पिकाची पेर मोठया आशेने व उत्सहात झाली त्यानतंर मात्र, अचानक हवामानात बदल होवून पाऊस लांबणीवर पडल्याने बळीराजा आता चिंतातुर झाला . अल्पक्षा पावसावर केलेली पेर  पाऊस लांबणीवर गेल्याने वाया जात असताना कधी मधी रिम झिम पाऊस होत राहील्याने पिके हिरवी राहीली मात्र वाढ खुटली मुग उडीद पिक  ऐन बहरात आले पण पाऊसा अभावी घोण्यात आलेले पिक कोमजले  त्यामुळे  अल्प उत्पादनावर शेतकऱ्यांना समाधान मानले  कापुस व तुर पिकावर शेतकऱ्याच्या आशा जिवंत आहेत पण सारीरात पाऊस आणि घोटभर पाणी अशी गत असल्याने पिकाची वाढ खुटली आहे रस शोषक किड्या ने कपाशी वर आक्रमण केल्या ने कपाशी पिक रोगाच्या खाईत लोटल्याने किटक नाशकाची फवारणी करावी लागणार असल्याने उत्पादन खर्चात भर पडणार    आहे 


 बाजारातून खते बी-बियाण्यांची खरेदीही शेतकर्‍यांनी केली व काळया आईची ओटी भरली पेरणी नतंर जोरदार पाऊस झाला नाही  मात्र, पाऊस पाडण्यासाठी अनुकूल असे वातावरण निर्माण होतांना दिसत असतानाही पाऊस पडत नसल्याने  बळीराजाचा पूर्णपणे हिरमोड झाला आहे दरम्यान दमदार पावसाची प्रतीक्षा असल्याने बळीराजाचे डोळे आभाळा कडे लागल्याचे दिसून येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या