*काल हॉटेल मालक संघटनांनी घेतली होती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट.
*हॉटेल व्यवसायाला
निर्बंधातून सूट द्यावी अशी केली मागणी.
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
काल हॉटेल मालक संघटनांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत हॉटेल व्यवसायाला निर्बंधातून सूट द्यावी अशी मागणी केली. त्यावर येत्या आठवडाभरात परिस्थिती पाहून निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हॉटेल मालक संघटनांना सांगितले आहे.
मला
लोकांची चिंता आहे, लोकांचा जीव महत्वाचा आहे,
असे सांगत आपण सध्यातरी निर्बंधांवर ठाम असल्याची भूमिका
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधोरेखित केली. मात्र, हॉटेल
मालक संघटनांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आठवड्याभरात परिस्थिती पाहून निर्णय
घेण्याची तयारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दाखवली आहे.
हॉटेल व्यवसायिकांना निर्बंधात शिथिलता न
मिळाल्यामुळे राज्याभर हॉटेल मालकांमध्ये मोठी नाराजी होती. ठाण्यातील
उपहारगृहांच्या मालकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले असून ठाणे जिल्ह्यात सोमवारपासून
उपहारगृहे बेमुदत बंद ठेवली जाणार आहेत. या बरोबरच कल्याणमधील हॉटेल
व्यावसायिकांनीही हॉटेल बंद ठेवण्याचा इशारा सरकारला दिला आहे.
0 टिप्पण्या