Ticker

6/Breaking/ticker-posts

निवडणुका आल्यावर विरोधकांना जाग येते; चला, तुम्हाला विकासकामे दाखविते- आ.मोनिका राजळे



लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

पाथर्डीगेली साडे चार वर्षे कुंभकर्णा प्रमाणे झोपेत असलेले विरोधक निवडणुका आल्यावर जागे होतात. एक कोविड सेंटर सुरू केले म्हणजे खुप मोठे काम केले असे त्यांना वाटते मतदारसंघात झालेला विकास दिसत नसेल तर माझ्या गाडीत या मी तुम्हाला मतदारसंघात फिरून विकासकामे दाखविते.ते जमत नसेल तर तुमच्या कारखान्या शेजारचा रस्ता आम्हीच केला आहे,तो तरी पहा  असे आमदार मोनिका राजळे यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे नेते अँड.प्रताप ढाकणे यान प्रतुत्तर  दिले.

 तालुक्यातील अत्यंत दुर्गम असलेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत माणिकदौंडी ते सोनाळवाडी या १ कोटी ६७ लाख व आल्हनवाडी ते काकडदरा या  १ कोटी २६ लाख रुपये किंमतीच्या रस्ता डांबरीकरण कामाचे भूमिपूजन आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक बाबाजी बोरसे हे होते.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष माणिक खेडकर,जिल्हा उपाध्यक्ष धनंजय बडे,माजी जि.प.सदस्य सोमनाथ खेडकर,मराठा सेवा संघाचे तालुकध्यक्ष बाळासाहेब सोनाळे,शिवसेना तालुकाप्रमुख अंकुश चितळे,पं.स.सदस्य सुनील ओव्हळ,सुभाष केकाण,बोरसेवाडी च्या सरपंच संजना बोरसे,राजेंद्र बोरसे,माजी पं.स.सदस्य रावसाहेब मोरे,रंजना बोरसे,शिवाजी मोहिते,माणिकदौंडीचे उपसरपंच समीर पठाण,शिवनाथ मोरे,जे.बी.वांढेकर,काळू जाधव,गंगाधर सुपेकर,सुनील रहाटे,श्रीकांत खेडकर,सतीश आठरे,अमोल शेळके,बाबा बोरसे,मिठ्ठु बडे,बबन चितळे,साईनाथ सोनाळे,भारत सोनाळे,शाखा अभियंता महेंद्र मुंगसे,रामदास बर्डे आदि उपस्थित होते.

   पुढे बोलतांना आ.राजळे म्हणाल्या मतदार संघात विकास कामे करतांना जनतेची गरज कोणती याला प्राधान्य दिले जाते.गावची लोकसंख्या किती,आपल्याला किती मते मिळाली याचा विचार कधीच केला  नाही.त्यामुळेच सोनाळवाडी,काकडदरा सारख्या तिनशे ते चारशे लोखसंख्या असलेल्या दुर्गम गावाला दीड ते दोन कोटी रुपये रस्त्यांसाठी मंजूर करून मुख्य रस्त्यांना जोडले जात आहे याचे समाधान वाटते.

गेली पाच वर्षात केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार होते त्यावेळी पंकजाताई मुंडे ग्रामविकास मंत्री आसतांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व जलयुक्तशिवार योजना सुरु केली.त्या माध्यमातून मतदार संघातील अनेक गावात रस्ते व बंधाऱ्यांची मोठी कामे झाली त्यामुळे पाणीसाठा वाढला असुन सध्या पाऊस लांबला तरी एकही टँकर सुरु करण्याची वेळ आली नाही. मी सहा सात वर्षांपासून कोणावरही टीका न करता काम करण्याला महत्व दिले.ज्यांनी मला पदावर बसवले त्यांचाच मी विचार करते इतरांचा विचार मी करत नाही.बोलणारे कोण आणि काम  करणारे कोण याची जनतेला जाणीव असते.

निवडणुका आल्यावर विरोधक कुंभकर्णा सारखे जागे होतात.त्यांना झालेला विकास दिसत नसेल तर माझ्या गाडीत या तुम्हांला मतदार संघात फिरून विकास दाखवते.ते जमत नसेलतर तुमच्या कारखान्याच्या शेजारचा रस्ता तरी पहा तो पण मीच केला आहे.आम्ही मालाच्या ट्रक विकल्या नाही.हाणामाऱ्या केल्या नाही.विरोधकांना निवडणुका कधी होतील याची मात्र घाई झाली आहे.एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हाताला कळू नये हि आपली संस्कृती आहे. तुम्ही एक कोविड सेंटर सुरु केले तर  किती मोठे काम केले असे वाटते.आम्ही व पदाधिकाऱ्यांनी अनेक कोविड सेंटर सुरु केले त्याचा गाजावाजा व व प्रसिध्दी केली नाही. 

कोणावर टीका केली नाही.तुम्ही मात्र कोविड सेंटर उद्घान कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,आमच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांच्यासह माझ्यावर टिका केली.आज सुरू केलेली कामे मागील सरकारच्या काळात मंजूर झालेली आहेत. महाविकास आघाडी सरकाराने कोरोनाची भीती दाखवून अनेक योजना बंद केल्या.मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन चाळीस हजार कि.मी.रस्ते करू सांगितले अद्याप एकाही रस्त्याचा आराखडा,सव्हे,प्रस्ताव मंजुरी सुद्धा नाही.मुख्यमंत्री सांगतात कोरोना लसीकरणात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे.यासाठी लस केंद्र सरकार कडून मोफत दिली जाते तरीही राज्य सरकारकडून केंद्र सरकारला बदनाम केले जाते. 
    
काकडदरा येथील कार्यक्रमासाठी सरपंच मनिषा कर्डीले,परमेश्वर गव्हाणे, दत्तु पवार,राधकीसन कर्डीले,आण्णासाहेब फुंदे,संतोष कर्डीले,बबन गव्हाणे,प्रल्हाद कर्डीले,अशोक सत्रे,अंकुश पवार,अशोक पवार,दिगंबर पवार, सचिन पवार,अंकुश,मच्छिंद्र पवार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रास्ताविक इजिं. बाळासाहेब सोनाळे यांनी करून आभार मानले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या