लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
कणकवली: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनेतर
स्थगित झालेली जन आशीर्वाद यात्रा कालपासून
पुन्हा सुरू झाली असून राणे या यात्रेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि
शिवसेनेवर नेहमीपेक्षा अधिक आक्रमक होत घणाघाती टीका करत आहेत. रत्नागिरीतून पुढे
निघालेली ही यात्रा आज सिंधुदुर्गात पोहोचली आहे. येथे राणेंचे ढोल-ताशांच्या
गजरात जंगी स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी रोशनाई देखील करण्यात आले होते. हा
स्वागतसोहळा सुरू असताना राणे यांना एके ठिकाणी हाताला विजेचा शॉक लागला. हा
प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
रत्नागिरीतून
जन आशीर्वाद यात्रा पुन्हा सुरू केल्यानंतर केंद्रीय मंत्री राणे आज सिंधुदर्गातील कणकवली येथे दाखल झाले. तेथे
त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर
ते तेथून निघत होते. आसपास मोठी गर्दी होती. छत्रपतींच्या पुतळ्याला असलेल्या
रेलिंगवर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. त्यातील एका लोखंडी रेलिंगवर राणे
यांनी आधारासाठी हात ठेवला आणि त्यांना एकच शॉक बसला. राणे यांनी तातडीने हात
झटकून काढून घेतला.
0 टिप्पण्या