लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
अहमदनगरः 'राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी सहज व सोप्या
पद्धतीने दोन लाखापर्यंतची कर्जमाफी दिली. यातून जिल्हा बँकेला चौदाशे कोटी
रुपयांची कर्जमाफी मिळाली. मध्येच करोनाचे संकट आले, अन्यथा
दोन लाखांच्या पुढचीही माफी देता आली असती. परंतु आगामी काळात तीही नक्की दिली
जाईल,' अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.
कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे होते. आमदार डॉ. सुधीर तांबे, ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, बँकेचे संचालक गणपतराव
सांगळे, प्रशांत गायकवाड, माजी
उपाध्यक्ष रामदास वाघ, आर. बी. रहाणे, रामहरी
कातोरे, लक्ष्मणराव कुटे, अजय फटांगरे,
युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाष सांगळे, भारत
शेठ मुंगसे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वरपे,
तालुका विकास अधिकारी अशोक थोरात, प्रांताधिकारी
डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम यावेळी उपस्थित
होते. संगमनेर तालुक्यात यावर्षी ९९.५५ टक्के कर्जवसुली झाली आहे. ३८ शाखांपैकी ३५
शाखांची शंभर टक्के वसुली झाली आहे. याबद्दल पदाधिकारी आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांचा
थोरात यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
0 टिप्पण्या