लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
अहमदनगर : येथील तपोवन रोडवरील संभाजी चौकातील दुकानांना दुपारी अचानक आग लागून ७ पैकीं ४ गाळे जळून भस्मसात झाले. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले. आगीचे वृत्त समजताच माजी नगरसेवक निखिल वारे, नगरसेवक सुनील त्रिंबके यांनी तात्काळ कार्यकर्त्यांसह धाव घेत नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणली त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
तपोवन रोड सध्या वेगाने विस्तारत आहे. औरंगाबाद रोड वरून हॉटेल इंद्र्यानिपासून ते थेट एम आय डी सी पुलाला जोडणारा हा सुमारे पाच कि.मी. चा रस्ता आहे. रस्त्याच्या दुतर्फा मोठ - मोठ्या ईमारती तसेच परिसरात अपार्टमेन्ट वेगाने उभी राहत आहेत. या रस्त्यावर आता चांगलीच वर्दळ असते.
विस्तारणाऱ्या या रोडवर दुतर्फा गाळे मोठ्या संख्येने कपडे,भांडी,बांधकाम साहित्यासह विविध जीवनावश्यक वस्तूंचे गाळे उभे राहिले आहेत. तथापि अनेक गाळे हे पत्र्याच्या शेडचे आहेत. संभाजी महाराज चौकातील गाळ्याना काल अचानक आग लागली. एका रांगेत असलेल्या गाळ यांपैकी ४ गाळ्या तील सर्व साहित्य जळून खाक झाले. महापालिका अग्निशमन बम्ब दाखल होऊन सदरची आग आटोक्यात आली.
यातील कपड्याचे दुकानाला आधी आग लागली, त्यामुळे एकच भडका उडाला. लगतचे सिरॅमिक व अन्य दोन दुकाने जळून गेले.आग इतर गाल्याना देखील आग लागली परंतु माजी नगरसेवक निखिल वारे, नगरसेवक सुनील त्रिंबके यांनी तात्काळ कार्यकर्त्यांसह धाव घेत आग आटोक्यात आणली त्यामुळे पुढील अनर्थ टळला. आगीचे कारण स्पष्ट झाले नाही परंतु शनिवार मुळे दुकाने बंद असल्याने ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या आगीत नक्की किती नुकसान झाले याचा निश्चित आकडा नसला तरी सुमारे ६० ते ७० लाखाचे नुकसान झाल्याचे सांगितले जाते.सुदैवाने शनिवारी दुकाने बंद असल्याने जीवितहानी झाली नाही..
0 टिप्पण्या