लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांना सक्तवसुली
संचालनालयाने ईडी आज नोटीस बजावली असून यावरून राजकारण तापू लागलं आहे. शिवसेना नेते आणि
खासदार संजय राऊत यांना
अत्यंत धारदार शब्दांत यावर प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांना रत्नागिरीत अटक झाली.
या रत्नागिरी जिल्ह्याचे अनिल परब हे पालकमंत्री आहेत. त्यामुळे वरच्या सरकारचं जे
लव्ह लेटर आलं आहे ते कसं आलं, हे आमच्या लक्षात आलं
आहे. आम्ही काही गुन्हेगार नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. ही सगळी लढाई
आम्ही कायद्यानेच लढू, असे राऊत यांनी मुंबईत माध्यमांशी
बोलताना सांगितले. आम्ही नॉर्मल माणसं आहोत. त्यामुळे आम्ही काही कुणाला धमक्या
देणार नाही. नॉर्मल माणसे कायद्याने चालतात. तसेच याबाबतीतही आम्ही करू. जे सत्य
आहे ते समोर येईलच आणि जे बनावट आहे त्याचा पर्दाफाशही होईल, असे सांगत सूचक इशाराही राऊत यांनी दिला.
0 टिप्पण्या