Ticker

6/Breaking/ticker-posts

निंबळक बायपासवर वाहतूक ठप्प ; रुग्णवाहिका अडकल्याने उडाला गोंधळ

 







लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 अ.नगर: शनिवारी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत मनमाड रस्त्यावरील विळद, निंबळक वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने ही मोठा गोंधळ उडाला होता.

शनिवारी सकाळपासूनच मनमाड महामार्गावरून नगर एमआयडीसी मार्गे नगर शहराकडे जाणारी तसेच बायपास मार्गे पुणे रस्त्याला जाणाऱ्या मार्गावरती दोन्ही बाजूंनी प्रचंड वाहतूक कोंडी झाल्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मालवाहू ट्रक, प्रवासी वाहनेकंटेनर तसेच रुग्णवाहिका यांचीही मोठी वाहतूक कोंडी झाली होती. कुठे अपघात झाला की वाहन बंद पडले हे पाहण्यासाठी प्रवासी वाहनांमधून खाली उतरून काही किलोमीटर पायी चालत जात होते. विळद- निंबळक केडगाव यादरम्यान साधारणपणे १० किलोमीटर अंतरावरती वाहनांच्या  लांबचलांब रांगा लागल्या होत्या.

 या परिसरातून सातत्याने प्रवास करणाऱ्या काही जणांनी निंबळक, निमगाव वाघा फाटा रस्त्या मार्गे कल्याण रोड मार्गे जाऊन पुणे व सोलापूर रस्त्याकडे प्रयाण केले. या वाहतूक कोंडीत मनमाड महामार्ग मार्गावर रुग्णवाहिकेत सायरन वाजवत होता. रुग्णवाहिकेतील रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांची घालमेल सुरू होती. हे विदारक दृश्य पाहून प्रवासी वाहनातील नागरिक रस्त्यावर उतरून रुग्णवाहिकेला रस्ता करून देत होते. रुग्णवाहिके सह इतर वाहने मुंगीच्या पावलांनी पुढे सरकत होते. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे  पाटील यांनी घटनास्थळी पोलिस फौजफाटा पाठवून वाहतूक सुरळीत करण्याला प्राधान्य दिले. रात्री उशिरापर्यंत वाहतूक सुरळीत करण्यात येत होती.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या