लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
ईस्लामाबाद: कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या
पाकिस्तानची आर्थिक स्थिती बिकट असल्याचे म्हटले जात आहे. पाकिस्तान सरकारकडून
निधी उभारण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान
यांचे अधिकृत निवासस्थान आता भाडे तत्वावर देण्यात येणार आहे. याआधी ऑगस्ट २०१९
मध्ये सत्ताधारी पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफने पंतप्रधानांच्या घराचे रुपांतर
विद्यापीठात करण्याची घोषणा केली होती.
आहे. समा टीव्हीने
दिलेल्या वृत्तानुसार, संघीय
सरकारने पंतप्रधानांच्या निवासस्थानाचे रुपांतर विद्यापीठात करण्याचा निर्णय बदलला
आहे. त्याऐवजी हे निवासस्थान भाडे तत्वावर देण्यात येणार आहे. त्यातून महसूल
मिळवण्यात येणार आहे. कॅबिनेटने घेतलेल्या निर्णयानुसार, हे
निवासस्थान शैक्षणिक संस्थेला देण्याऐवजी सांस्कृतिक, फॅशन
आणि अन्य कार्यक्रमांसाठी भाडेतत्वावर देण्यात येणार आहे.
पाकिस्तानमधील समा टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, सरकारने यासाठी दोन समित्या स्थापन
केल्या आहेत. पंतप्रधान निवासस्थानात नियमांचे उल्लंघन होता कामा नये याकडे ही
समिती लक्ष ठेवणार आहे. पंतप्रधान निवासस्थानाच्या माध्यमातून महसूल मिळवण्यासाठी
कॅबिनेटमध्ये चर्चा होणार आहे. पंतप्रधान निवासस्थानातील सभागृह, दोन गेस्ट विंग्स आणि एक लॉन भाडेतत्वावर देऊन महसूल मिळवला जाऊ शकतो.
त्याशिवाय उच्चस्तरीय राजनयिक कार्यक्रम आणि आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन
करण्यात येईल.
पाकिस्तानच्या
पंतप्रधानपदाची सूत्रे सांभाळल्यानंतर इम्रान खान यांनी काटकसरीचे धोरण अवलंबले
होते. लोककल्याणकारी योजनांवर खर्च करण्यासाठी निधीचा तुटवडा असल्याने त्यांनी
अनेक खर्चांमध्ये कपात केली होती. इम्रान खान सत्तेवर आल्यानंतर पाकिस्तानची
अर्थव्यवस्था १९ अब्ज डॉलरपर्यंत कमी झाली आहे.
0 टिप्पण्या