Ticker

6/Breaking/ticker-posts

जगातील सर्वात लहान ४जी स्मार्टफोन लाँच, ‘एवढी’ आहे किंमत

 

सर्वात लहान ४जी स्मार्टफोन लाँच.

चीनच्या Mony कंपनीने हा फोन लाँच केला आहे.

या फोनमध्ये ३ इंचाचा टच डिस्प्ले मिळतो.





लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

 नवी दिल्ली : चीनची स्मार्टफोन कंपनी Mony ने आपला नवीन स्मार्टफोन Mony Mint ला लाँच केले आहे. कंपनीचा दावा आहे की मनी मिंट जगातील सर्वात लहान ४जी कनेक्टिव्हिटीसह येणारा स्मार्टफोन आहे. डिव्हाइसमध्ये ३ इंचाचा टच डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन एलटीई कनेक्टिव्हिटी सपोर्टसह येतो.


Mony  Mint  हा स्लीक, लहान आकर्षक डिझाइनसह येणारा स्मार्टफोन आहे. फोन तळहातावर देखील सहज फिट होते. आकारने लहान असल्याने यात पोर्ट आणि बटनांची संख्या कमी आहे. या हँडसेटमध्ये वॉल्यूम आणि पॉवर बटनसह यूएसबी टाइप-सी पोर्ट मिळतो.

Mony Mint  स्मार्टफोनमध्ये ३ जीबी रॅम आणि ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेज देण्यात आले आहे. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डद्वारे १६४ जीबीपर्यंत वाढवू शकता. हा ड्यूल सिम स्मार्टफोन असून, यात काही अ‍ॅप्स आधीपासून इंस्टॉल मिळतात.

हा स्मार्टफोन अँड्राइड ९ वर काम करतो. कंपनीचा दावा आहे की, यात जगभरातील वायरलेस नेटवर्कचा सपोर्ट मिळतो. याशिवाय वायरलेस कॉल करणे देखील शक्य आहे. फोनमध्ये १२५० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. सिंगल चार्जमध्ये बॅटरी ३ दिवस टिकेल असा कंपनीचा दावा आहे. या स्मार्टफोनची किंमत १५० डॉलर्स (जवळपास ११,२०० रुपये) आहे. मात्रIndiegogo वरून Super Early Bird offer अंतर्गत फोनला १०० डॉलर्स (जवळपास ७,५०० रुपये) किंमतीत खरेदी करता येईल. फोनची विक्री नोव्हेंबर २०२१ पासून सुरू होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या