लोकनेता न्यूज
नगरः नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेत बनावट सोने गहाण ठेवून सुमारे ५ कोटी ३० लाख रुपयांचे कर्ज घेतल्याप्रकरणी १५९ कर्जदारांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय हे सोने खरे असल्याचे प्रमाणपत्र देणारा सराफ विशाल गणेश दहिवाळकर यांच्याविरूद आणि कटात सामील असलेल्या संबंधितांविरूद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२०१७ मध्ये हे कर्ज वाटप झाले होते. त्याची परतफेड न केल्याने जून २०२१ मध्ये गहाण ठेवलेल्या सोन्याचा लिलाव करण्यात आला. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. शाखाधिकारी अनिल वासुमल आहुजा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तत्कालीन शाखाधिकाऱ्याने
गेल्याच आठवड्यात आत्महत्या केली आहे.
अर्बन बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून यापूर्वीच प्रशासकाची
नियुक्ती करण्यात आलेली आहे. जुन्या संचालकमंडळाच्या कारभाराबद्दल अनेक तक्रारी
आहेत. त्यापैकी शेवगावचेही प्रकरण होते. भाजपचे माजी केंद्रीय मंत्री दिवंगत दिलीप
गांधी त्या काळात बँकेचे अध्यक्ष होते. दुदैर्वाने त्यांचे काही महिन्यांपूवीच
निधन झाले आहे. तर या प्रकाराची चौकशी सुरू असताना बँकेच्या शाखाधिकाऱ्याने विष
प्रशासन करून आत्महत्या केली आहे. या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचे चिठ्ठी
त्यांनी लिहून ठेवली होती. आता गुन्हा दाखल झाल्याने या कटात कोण कोण सहभागी होते, याचा तपास पोलिसांना करावा लागणार आहे.
0 टिप्पण्या