लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
पुणे: करोना संसर्गाचा धोका कायम असताना व केंद्राकडून आगामी सणांच्या काळात निर्बंध लावण्याबाबत सूचना
करण्यात आल्या असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज यावर
महत्त्वाचे विधान केले आहे. नियमांबाबत अजित पवार यांनी अगदी स्पष्ट शब्दांत इशारा
दिला आहे.
संसर्गाचा
प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून जे प्रयत्न सुरू आहेत ते कौतुकास्पद
आहेत. दैनंदिन नवीन करोना बाधितांच्या संख्येत गेल्या महिनाभरापासून राज्यात घट
पाहायला मिळत आहे मात्र, काही जिल्ह्यांत रुग्णसंख्या वाढत असल्याने
अधिक खबरदारी घ्यावी लागेल. येत्या काळात दहीहंडी आणि गणेशोत्सव यासारखे मोठे सण
आहेत. या सणांच्या काळात गर्दी होण्याची शक्यता आहे. कोविडचा धोका पाहता ही गर्दी
टाळणे गरजेचे आहे. त्यासाठी निर्बंध लावण्याचा विचार राज्य सरकारने करावा, अशी सूचना केंद्रीय आरोग्य सचिवांनी या पत्रात केली आहे. त्याआधी रात्रीची
संचारबंदी लावण्याची सूचनाही करण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी
आज स्पष्ट इशाराच दिला आहे
0 टिप्पण्या