*जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला नवा आदेश.
*दैनंदिन रुग्णवाढ मोठी असूनही मिळणार दिलासा.
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
अहमदनगर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केलेल्या अहमदनगर जिल्ह्यात दैनंदिन रुग्णसंख्येत शुक्रवारी
पुन्हा वाढ झाली. त्यामुळे राज्य सरकारने लागू केलेल्या सवलती मिळतात की नाही,
अशी शंका व्यक्त होत असतानाच जिल्हाधिकाऱ्यांचा नवा आदेश जारी झाला.
त्यानुसार राज्यातील अन्य जिल्ह्यांत लागू करण्यात आलेल्या सर्व सवलती १५
ऑगस्टपासून अहमदनगर जिल्ह्यातही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी विशेषत:
व्यापारी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे. मात्र, रुग्ण
वाढून ऑक्सिजनची कमतरता भासू लागल्यास केव्हाही पुन्हा निर्बंध लागू करण्यात येणार
आहेत.
अहमदनगरसह
काही जिल्ह्यांत कोविड रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त होत होती. हे जिल्हे वगळून इतर
जिल्ह्यांत सवलती देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतर
निकष बदलून ऑक्सिजनची उपलब्धता हा निकष गृहित धरण्यात आला. त्यानुसार राज्यभरासाठी
सवलती जाहीर करण्यात आल्या. नगर जिल्ह्यात १७ ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात आले आहेत.
त्यातील काहींची उभारणी सुरू आहे. त्यातून ८४ टन ऑक्सिजन उपलब्ध होत आहे. त्यामुळे
राज्यातील अन्य जिल्ह्यांना देण्यात येणाऱ्या सवलती नगरलाही लागू करण्यात आल्या.
जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी हा आदेश
0 टिप्पण्या