*नीरज चोप्राने घडवला
इतिहास
*प्रत्येक भारतीयांना नीरज
चोप्राचा अभिमान वाटतोय
*नीरज चोप्रावर बॉलिवूडकरांनी केला अभिनंदनाचा वर्षाव
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
मुंबई : टोकिओ येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक २०२० मधील भालफेक
स्पर्धेत नीरज चोप्राने सुवर्ण पदक पटकावले आहे. नीरजने केलेल्या सुवर्णवेधी
कामगिरीमुळे त्याच्यावर देशातील कोट्यवधी जनता शुभेच्छांचा वर्षावर करत आहेत.
त्याच्यासोबतच अनेक कलाकारांनी देखील त्यांच्या सोशल मीडियावर नीरजचे अभिनंदन केले
आहे. टोकिओ येथील ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताचे हे पहिले सुवर्ण आणि एकूण सातवे
पदक आहे.
आज तुझ्यामुळे
कोट्यवधी लोकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले
अभिनेता अक्षय कुमारने नीरजने केलेल्या
कामगिरीचे ट्विटरवर भरभरून कौतुक केले आहे. अक्षयने लिहिले आहे, ' सुवर्ण पदक जिंकून नीरज चोप्रा आपण एक नवीन इतिहास रचला आहे... तुमचे खूप खूप अभिनंदन...
तुमच्यामुळे भारतामधील कोट्यवधी लोकांच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू आले आहेत... वेल
डन.
हा सर्वांसाठी
अभिमानाचा क्षण
प्रसिद्ध निर्माता गोल्डी बहल यांनी देखील
नीरजा फोटो शेअर करत त्याचे अभिनंदन केले आहे. त्यांनी लिहिले आहे, ' नीरज चोप्राने भालफेक स्पर्धेमध्ये
सुवर्ण पदक जिंकले हे आपले भाग्य आहे. भारताचे अॅथलेटिकमधील हे पहिले पदक आहे. ही
गोष्ट आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गर्वाची आहे...'
देशाला मोठा
सन्मान मिळवून दिला
प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी देखील
नीरजचे भरभरून कौतुक केले आहे. त्याने लिहिले आहे, 'खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन! नीरज चोप्रा तुम्ही संपूर्ण
देशाला मोठा सन्मान मिळवून देत मान उंचावली आहे...'
बातमी ऐकून मी
आनंदाने नाचले!
अभिनेत्री तापसी तन्नु हिने देखील ट्विटरवरून नीरजला शुभेच्छा दिल्या आहेत. तिने लिहिले
आहे, ‘आपण
सुवर्णपदक जिंकलो. ही बातमी ऐकल्यानंतर मी आनंदाने उड्या मारल्या. नीरज चोप्रा या
तरुणाने इतिहास रचला आहे...'
भारत माता की
जय!
अभिनेता रणवीर सिंग याने देखील सोशल
मीडियाद्वारे नीरजच्या कर्तृत्वाबद्दल त्याचे अभिनंदन केले होते. ने नीरज
इन्स्टाग्राम स्टोरीवर नीरजाचा फोटो शेअर करत ‘भारत माता की जय’ असे म्हटले आहे.
देशवासियांसाठी
अभिमानाचा क्षण
अभिनेता अनिल कपूर यांनी देखील नीरजचे
कौतुक केले आहे. त्यांनी लिहिले आहे, ' अॅथलेटिकमधील भारताचे हे पहिले सुवर्ण पदक... प्रत्येक भारतीय नागरिकासाठी
हा अभिमानाचा क्षण आहे... दैदिप्यमान इतिहास रचला गेलाय...'
जय हिंद!
अभिनेता रितेश देशमुख याने देखील
भालफेकमध्ये सुवर्णपदक पटकावल्यानंतर त्याचे अभिनंदन केले आहे. त्याने लिहिले आहे, 'सुवर्ण सुवर्ण सुवर्ण... नीरज चोप्रा
तुमचे मनःपूर्वक अभिनंदन! हा क्षण प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण आहे. जय
हिंद!'
0 टिप्पण्या