Ticker

6/Breaking/ticker-posts

खरवंडी कासारची मराठी शाळा बनली ' बेवडयांची चावडी'; ज्ञानदानाच्या प्रवित्र ठिकाणीच होते मदीरापान

 



लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 खरवंडी कासार :  ज्या  इमारतीच्या आवारात ज्ञानदान व ज्या खोलीत ज्ञानग्रहण केले जात होते ,त्या पवित्र  शिक्षण मंदीरात सर्रास मदीरा ग्रहन केली जात असल्याचा  धक्कादायक प्रकार खरवंडी कासार येथे घडत आहे .

एकी कडे कोरोना मुळे गेल्या दोन वर्षापासुन शाळा बंद आहे.  शाळेतील ज्ञानदान बंद पडले असल्याने शाळेच्या आवारात स्मशान शातंता जाणवत आहे. मात्र पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार जिल्हा परिषद प्राथमिक शाळाचे आवार तळीरामाचा अडडा बनला असून हे शिक्षण मंदीर म्हणजे बेवडयांची चावडी बनले आहे .शाळेच्या आवारात मोठया प्रमाणात  दारूच्या मोकळ्या झालेल्या बाटल्या व दारूच्या फुटलेल्या बाटल्याच्या काचा , पाण्याचे ग्लास यांची साक्ष देत आहेत .

विशेष म्हणजे वर्ग खोल्याच्या  रंग  काम केलेल्या वर्गाच्या भिंती ही मावा गुटक्याच्या पिचकाऱ्या मुळे बेरंग झाल्या असुन हि शाळेचीच इमारत व प्रागंण आहे का अशी शंका या ठिकाणी प्रवेश केल्यावर आल्याशिवाय रहात नाही.

शाळा इमारत उदघाटनापुर्वीच तळीरामाचा धुडगुस : 

निंबोडी येथिल शाळेची इमारत पडुन दुर्घटना घडल्यानतंर जिल्हयातिल ब्रिट्रीश कालीन व जिर्ण शाळा इमारतीचे निरलेखन झाले. त्यामध्ये खरवंडी येथिल बिट्रिश कालीन इमारतीचे निलेखण होऊन हि शाळा जमीनदोस्त करण्यात आली त्यामुळे शाळेला इमारत नसल्याने दोन वर्षापुर्वी येथिल   प्राथमिक शाळेला इमारत नसल्याने महादेव मंदीरामध्ये वर्ग भरविल्या गेले .

 जिल्हा परिषद सदस्या सौ . प्रभावती ढाकणे यांच्या प्रयत्ना मधुन येथे शाळेला इमारत मजुंर झाली .त्यांचे चागंले  काम झाले रंग रंगोटी झाली उदघाटनाच्या पुर्वीच कोरोना  साथीचा  प्रादुर्भाव वाढु नये म्हणुन शाळा बंद राहील्या उदघाटन झाले नाही .मात्र बंद शाळेचे गेट व वर्ग खोल्याचे लोखंडी दरवाजे तोडत एक प्रकारे  सैराटानी उदघाटन केले . घाणीचे सामराज्य झालेचे  स्वातंत्र्च्यदिनाचे दिवशी झेडांवदांनाच्या निमित्य उपस्थित ग्रामस्थाच्या ध्यानात आले . तेव्हा तळीरामानी व सैराटानी शाळेचे तोडलेले गेट पुन्हा दुरुस्त केले पण ते गेट पुन्हा दुसऱ्या दिवशी तुटले गेले आहे . मैदानावर लहान मुले बागडतात त्या  शाळेच्या मैदाणावर दारूच्या बाटल्या व काचा आहेत तर काही व्यक्तीनी शौचायासाठी वापर केल्याचेही दिसून येते .

 एक गांव बारा भानगडी .. !

गांव म्हटलं की , प्रत्येकजण स्वयंघोषित पाटील असतो , शिवाय त्यांच्या दिमतीला झेले अण्णांची हल्ली कमी नाही.. एकूणच काय तर थोडक्यात   'एक गांव .. बारा भानगडी' त्यामुळे नेमकं कुणी कुणाला काय सांगावं अन् ऐकूण कुणाचं कोण घेतो अशी सर्वसाधारण परिस्थिती असते .   तशीच काहीशी स्थिती सध्या खरवांडीची झाली आहे. माणसं गावातलीच. गांव  ही आपलाच .. शाळा आपलीच ...मग दाद अन् फिर्याद मांडायची तरी कुणाकडं  त्यामुळं  शाळेची   आणि परिसरावर ही परिस्थिती ओढवली आहे.

.याबाबत मुख्याध्यापक अशोक ढोले यांच्याशी सवांद साधला असता या शाळेत कोणीतरी  उन्हाळ्याच्या सुट्टी मध्ये शाळेचे गेट व शाळेच्या खोल्याचे लोखंडी दरवाजे तोडले होते . वर्गात दारूच्या मोकळ्या  बाटल्या पत्ते होते भिंती वर दिलेल्या रगांचाही मावा गुटक्याच्या पिचकाऱ्यानी बेरंग झाल्याचे त्यांनी मान्य केले . मात्र 

या शाळेत सिसिटिव्ही बसवलेले आहेत सिसिटिव्हीचे  फुटेज तपासुन शाळेच्या पवित्र मंदीराचा   गैर कृत्यासाठी वापर करणाऱ्यावर गुन्हा  नोंद करून कठोर कारवाई करण्याची गरज आहे .याबाबत शिक्षण विभागाने पुढाकार घेऊन या पवित्र वास्तुचे  प्रावित्र्य भंग करणाऱ्याला धडा शिकववावा अशी मागणी प्रामाणिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या