Ticker

6/Breaking/ticker-posts

धक्कादायक ! विषारी इंजेक्शन टोचवून घेत युवा डॉक्टरची आत्महत्या

 








लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 अहमदनगर: ज्या खुर्चीवर बसून रुग्णांना बरे होण्याची इंजेक्शन दिली, त्याच खुर्चीवर बसून जीवन संपविण्यासाठी स्वत:लाच इंजेक्शन टोचवून घेतले. इतरांच्या आजारपणावर उपचार करणाऱ्या युवा डॉक्टरने स्वत:च्या आजारपणाला कंटाळून आत्महत्या केली. कर्जत तालुक्यातील मिरजगावमध्ये ही घटना घडली. डॉ. विश्वास अर्जुन कवळे (वय २९) असे या युवा डॉक्टरचे नाव आहे.

शुक्रवारी रात्री ही घटना घडली. आत्महत्या करण्यापूर्वी डॉ. कवळे यांनी टेबलावरच चिठ्ठी लिहून ठेवली. आजारपणाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असून यासाठी कोणालाही जबबादर धरू नये, असे त्यात म्हटले आहे. आईवडिलांची काळजी घ्या, असे भावंडांना उद्देशून त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या आजाराबद्दल माहिती मिळू शकली नाही.

डॉ. कवळे यांनी बीएएमएस ही वैद्यकीय पदवी घेतली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मिरजगावमधील घरातच त्यांनी दवाखाना सुरू केला. सुमारे दोन वर्षांपासून ते हा दवाखाना चालवित होते. त्यांचा व्यवसायही उत्तम सुरू होता. काही दिवसांपूर्वीच त्यांनी मोफत आरोग्य तपासणी शिबीरही घेतले होते. कुटुंबीय आणि मित्रमंडळीत ते आशू नावाने ओळखले जात शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत ते घरात आले नाहीत, त्यामुळे त्यांची आई त्यांना पाहण्यासाठी खालच्या मजल्यावरील दवाखान्यात आल्या. त्यावेळी डॉ. कवळे त्यांच्या खुर्चीत निपचित पडलेले आढळून आले. हे दृष्य पाहून त्यांना धक्काच बसला. कुटुंबीय व मित्रांनी त्यांना रुग्णालयात नेले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले.

आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी टेबलावर ठेवलेल्या सुसाईट नोटमध्ये कोणते इंजेक्शन घेतले याचाही उल्लेख केला आहे. याशिवाय संपत्तीचे वाटप कसे करावे, आपल्यावर अंत्यसंस्कार कोठे करावेत, याबद्दल लिहून सर्वांची माफीही मागितली आहे. माझ्या मृत्यूला फक्त मी स्वत: जबाबदार आहे, इतर कोणालाही यासाठी जबाबदार धरू नये, असेही त्यांनी म्हटले आहे.

शनिवारी दुपारी त्यांच्यावर पाथर्डी तालुक्यातील पिंपळगाव कासार या त्यांच्या मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे वडील सेवानिवृत्त शिक्षक आहेत. मिरजगाव परिसरात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या