लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नवी दिल्ली : AAI Recruitment 2021: एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ
इंडिया (Airports Authority of India) मार्फत सीनियर
असिस्टंट (Sr. Assistant) पदांवर भरती प्रक्रिया सुरू आहे.
या अर्ज प्रक्रियेची मुदत लवकरच संपणार आहे. या पदांसाठी जुलैमध्ये सुरू झालेली
रजिस्ट्रेशन प्रक्रिया AAI ३१ ऑगस्ट २०२१ रोजी बंद करणार
आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप या भरतीसाठी अर्ज केलेला नाही, त्यांच्याकडे अजूनही एक शेवटची संधी आहे. अखेरच्या मुदतीनंतर कोणताही
ऑनलाइन अर्ज स्वीकारला जाणार नाही.
ज्यांना या भरतीसाठी
अर्ज करायचा आहे, ते उमेदवार अधिकृत वेबसाइट aai.aero वर जाऊन अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून २९ पदे भरली
जाणार आहेत.
रिक्त पदांचा तपशील
वरिष्ठ सहायक (ऑपरेशन) - १४ पदे
वरिष्ठ सहायक (वित्त) -६ पदे
वरिष्ठ सहायक (इलेक्ट्रॉनिक्स) - ९ पदे
वरिष्ठ सहायक (ऑपरेशन्स), वरिष्ठ सहायक (वित्त) आणि वरिष्ठ सहाय्यक (इलेक्ट्रॉनिक्स) या तिनही पदांसाठी ३६ हजार ते १ लाख १० हजार रुपयांपर्यंत पगार मिळू शकेल.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाने २९ जुलै रोजी
हे नोटिफिकेशन जाहीर केले होते. तुम्हाला अर्ज करायचा असेल तर ३१ ऑगस्ट २०२१ ही
शेवटची तारीख आहे. या पदांसाठी उमेदवारांची वयोमर्यादा ३० जून २०२१ पर्यंत ५०
वर्षे असणे गरजेचे आहे. या अंतर्गत एकूण २९ पदांसाठी अर्ज मागविण्यात आले
आहेत.
0 टिप्पण्या