आरोग्य सेवेत केलेले कार्य ‘मानवतेचे दर्शन घडविते’- किशोर रेणाविकर
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नगर - सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले जालिंदर बोरुडे यांनी 1 लाख 97 नेत्ररुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करुन त्यांना दृष्टी देण्याचे काम केले आहे. त्यांनी आरोग्य सेवेत केलेले कार्य ‘मानवतेचे दर्शन घडविते’. त्यांच्या कार्यास प्रोत्साहन देण्यासाठी सामाजिक कार्यात सक्रीय असलेल्या ‘स्नेह 75’ च्यावतीने त्यांचा सन्मान करुन मानतेचा पुरस्कार करण्याचा प्रयत्न यानिमित्त केला असल्याचे प्रतिपादन किशोर रेणाविकर यांनी केले.
जागतिक मानवता दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे यांचा भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या ‘स्नेह 75’ या बॅचच्यावतीने गौरव करण्यात आला. याप्रसंगी अभय गांधी, किशोर रेणाविकर, अजित चाबुकस्वार, विश्वनाथ पोंदे आदि उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, जागतिक पातळीवर अनेक घडामोडी घडत आहेत. प्रत्येक राष्ट्र आपली ताकद दाखविण्यासाठी शस्त्राचा धाक दाखवत आहे. नुकताच तालिबानांनी अफगाणीस्तावर ताबा मिळविलेला आहे. तेथील निष्पाप नागरिकांवर अन्याय, अत्याचार करत आहे. ही मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे. कोणताही धर्म किंवा जात हिंसा शिकवत नाही. तर अखिल मानवजात ही एक असून, आपण सर्व त्या परत्म्याची लेकरे आहोत, हीच शिकवण देते. प्रत्येकाने आपल्यातील मानवता धर्म जपला पाहिजे. मानवाच्या उन्नत्तीसाठी काम करणारे हे खरे रक्षणकर्ते आहेत.
सत्कारास उत्तर देतांना जालिंदर बोरुडे म्हणाले, अखिल मानवतेचे रक्षण व्हावी, यासाठी अनेक साधू-संतांनी आपल्या संत वाङमनयातून, ग्रंथातून सांगितले आहे. त्याचा उपयोग आपल्या आचरणात केल्यास एक मानवतेची साखळी निर्माण होईल. प्रत्येकाने सेवाभावीवृत्तीने काम केल्यास समाजातील दु:ख नाहीसे होण्यास मदत होईल. मानव सेवा ईश्वर सेवा मानून आपण फिनिक्स सोशल फौंडेशनेच्या माध्यमातून सुरु असलेल्या कार्यात अनेकजण हातभार लावत आहे. आज ‘स्नेह 75’च्यावतीने केलेल्या सत्कारामुळे फिनिक्स परिवार आणखी विस्तरला आहे, असे सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्तविकात विश्वानाथ पोंदे यांनी ‘स्नेह 75’च्यावतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती देऊन जालिंदर बोरुडे यांच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभय गांधी यांनी केले तर अजित चाबुकस्वार यांनी आभार मानले.
0 टिप्पण्या