स्थानिक गुन्हे शाखा व अकोले पोलीस यांची संयुक्त कारवाई
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
अकोले: अकोले
तालुक्यातील वीरगाव फाटा येथे कोंबड्याच्या शेडच्या आडोशाला तिरट नावाचा जुगार
खेळताना व खेळवितांना शहरातील काही प्रतिष्ठितांसह १२ जणांना स्थानिक गुन्हे
शाखेच्या व अकोले पोलिसांच्या संयुक्त पथकाने रंगेहात पकडून २५ हजार ११०
रूपयांच्या रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त केले . याप्रकरणी अकोल पोलिस स्टेशनला
गुन्हा दाखल झाला आहे .
तालुक्यातील विरगाव फाट्याजवळ कोंबड्याच्या शेडच्या आडोशाला तिरट नावाचा हार
-जितीचा जुगार खेळण्याचा क्लब सुरु असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे
पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाल्याने पोलीस निरिक्षक अनिल कटके
यांनी एक तात्काळ पोलीस पथक घटनास्थळी पाठवले व
त्यांच्या आदेशाने पोलीस नाइक लक्ष्मण खोकले , पोलीस नाईक शंकर चौधरी , पोलीस कॉन्स्टेबल राहुल
साळुके ,पोलीस हेड कॉन्स्टेबल संभाजी कोतकर यांनी अकोले
पोलिस स्टेशनचे पोलीस निरिक्षक मिथुन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक
दत्तात्रय साबळे , पोलिस नाईक महेश आहेर , विठ्ठल शरमाळे , राजेंद्र कोरडे यांचे संयुक्त
पथकाने जावून छापा मारला . याप्रकरणी राजेंद्र ताया लोखंडे , भरत सुकदेव गायकवाड ( इंदिरानगर ) , अनिल निवृत्ती
वाकचौरे ( निंबळ ) , माणिक सखाराम चासकर ( बहिरवाडी ) ,
दिलीप काळु शिंदे ( शाहूनगर ) , अचानक दामोदर
गायकवाड ( इंदोरी ) , भानुदास रावबा गोर्डे ( बहिरवाडी ) ,
संदिप जयराम वैद्य ( कुंभारवाडा , अकोले ) ,
मोरेश्वर शांताराम चौधरी ( अकोले ) , जयराम
धोंडु लांघे ( शेणित ) , पुंडलिक देवराम भिडे ( कोर्ट शेजारी
, अकोले ) , अक्षय मारुती वाकचौरे (
परखतपुर ) अशा १२ जणांना जुगार खेळताना ताब्यात घेतले .
त्यांच्याकडील ५० , १०० , - २०० , ५०० अशा विविध दरांच्या : नोटा ज्यांची एकुण
रक्कम २५ हजार ११० रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे . अकोले पोलिस
स्टेशनला अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस नाईक लक्ष्मण खोकले यांचे फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पुढील कारवाई अकोले पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री मिथुन घुगे करत
आहेत.
0 टिप्पण्या