Ticker

6/Breaking/ticker-posts

शेवगावच्या आबासाहेब काकडे कनिष्ठ महाविद्यालयाचा तिन्ही शाखांचा 100% निकाल

   कला ,विज्ञान व वाणिज्य शाखेचा ऐतिहासिक निकाल








लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


 शेवगाव: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे यांचे वतीने काळ जाहीर झालेल्या इयत्ता बारावीच्या कला विज्ञान व वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी 100%  निकालाची परंपरा कायम राखली आहे.

शाखा निहाय प्रथम आलेले  तीन विद्यार्थी पुढीलप्रमाणे:

 कला शाखा-

1. देवढे प्रतीक्षा बाबासाहेब - 94.50,%

2.टेकाळे पल्लवी अशोक 94.33 %

3. आर्ले मनीष सुरेश  92.00 %

 विज्ञान शाखा -

1 . फुंदे गोरक्ष मच्छिंद्र -98.50 %

2.मुरदारे चैतन्य सोमनाथ 97.50 %

3.हाके पूजा बाबासाहेब 94.33 %

 वाणिज्य शाखा -

1.भागवत भार्गव सुधीर   -   95.50 %

2. चितळे रोहन किशोर-.  94.17 %

3.मालुरे कृष्णा भागवत-   93.33 %


शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये इयत्ता 12 वी कला शाखेत विद्यालयातील एकूण 299 विद्यार्थी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते पैकी 299 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा एकूण निकाल 100% लागला.विज्ञान शाखेमध्ये एकूण 266 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते पैकी सर्व 266 विद्यार्थी उत्तीर्ण झाले .तर वाणिज्य शाखेसाठी एकूण 58 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते पैकी सर्व 58 विद्यार्थी उत्तीर्ण झाले .

यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे आबासाहेब काकडे शैक्षणिक समूह शेवगावचे अध्यक्ष अॅड. विद्याधर उर्फ शिवाजीराव काकडे,जि.प सदस्या सौ.हर्षदाताई काकडे,शैक्षणिक विभागप्रमुख प्रा. लक्षमनराव बिटाळ,विद्यालयाचे प्राचार्य  संजय चेमटे, उपप्राचार्य सुनील आढाव, उपमुख्याध्यापक करमसिंग वसावे, पर्यवेक्षिका पुष्पलता गरुड मॅडम मंदाकिनी भालसिंग मॅडम कनिष्ठ महाविद्यालय पर्यवेक्षिका श्रीमती रूपा खेडकर मॅडम यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या