Ticker

6/Breaking/ticker-posts

SBI बँक : ग्राहकांसाठी आज आणि उद्या 'या' सेवा राहणार बंद...

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

मुंबई : देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने SBI आपल्या ४४ कोटी खातेदारांसाठी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. बँकेने ट्विट करून आपल्या ग्राहकांना सतर्क केले आहे. तसेच बँकिंग संबंधित कामे लवकरात लवकर उरकून घ्यावीत, असे आवाहनही केले आहे. बँकेच्या काही सेवा आज (शुक्रवार ता. १६) आणि उद्या (शनिवार ता.१७) बंद राहणार आहेत, अशी माहिती बँकेकडून देण्यात आली आहे.

एसबीआयने यासंबंधीचं ट्विट केलं असून ट्विटमध्ये म्हटलं आहे की, सिस्टीम मेटेनन्सच्या कारणास्तव १६ आणि १७ जुलै रोजी बँकेच्या काही सेवा बंद राहतील. यामध्ये इंटरनेट बँकिंगयोना, योना लाईट आणि यूपीआय सेवांचा समावेश आहे. १६ आणि १७ जुलै रोजी रात्री १० वाजून ४५ मिनिटांपासून ते मध्यरात्री १ वाजून १५ मिनिटांपर्यंत या सेवा खंडीत असतील, असे बँकेने म्हटलं आहे.


एसबीआयने दिलेल्या माहितीनुसार, बँक यूपीआय प्लॅटफॉर्म अपग्रेड करत आहे. ग्राहकांना मिळणारा ऑनलाइन सेवांचा अनुभव आणखी सुलभ करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी यूपीआय व्यवहार पूर्णपणे बंद असतील.

दरम्यान, एसबीआय पहिल्यांदाच अशा प्रकारची कोणतीही सेवा बंद करत आहे, असे नाही. याआधीही बँकेने ४ जुलै पहाटे ३ वाजून २५ मिनिटांपासून ५ वाजून ५० मिनिटांपर्यंत या सेवा बंद करण्यात आल्या होत्या. एसबीआयच्या देशभरात २२ हजाराहून अधिक बँक शाखा आहेत. ३१ डिसेंबर २०२० च्या आकडेवारीनुसार, एसबीआयच्या इंटरनेट बँकिंग ग्राहकांची संख्या ८.५ कोटी आहे, तर मोबाइल बँक ग्राहकांची संख्या १.९ कोटी आहे. यूपीआयच्या ग्राहकांची संख्या १३.५ कोटींहून अधिक आहे. त्यामुळे बँकेच्यावतीने पुरविण्यात येणाऱ्या सेवा बंद केल्यामुळे बर्‍याच ग्राहकांची गैरसोय होऊ शकते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या