Ticker

6/Breaking/ticker-posts

'भारत-पाकिस्तान मैत्री संबंधात RSS चा अडथळा'

 




लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

ताश्कंद : ताश्कंदमध्ये मध्य आणि दक्षिण आशियाई देशांच्या दोन दिवसांची परिषद होत आहे. या परिषदेत सहभागी होण्यासाठी इम्रान खान ताश्कंदमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी एएनआयच्या प्रतिनिधींने त्यांना भारत-पाकिस्तान चर्चेबाबत विचारले. त्यावर इम्रान खान यांनी म्हटले की, दोन्ही देशांनी एकत्र राहावे अशी आमची इच्छा आहे. भारताची आम्ही प्रतिक्षा करत आहोत. मात्र, दोन्ही देशांच्या संबंधामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचा अडथळा असल्याचे इम्रान खान यांनी म्हटले. तालिबान आणि पाकिस्तानच्या संबंधाबाबत प्रश्न पूर्णपणे विचारण्याआधीच इम्रान खानी यांनी पत्रकाराला टाळले.

काही दिवसांपूर्वी परदेशी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत भारतातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार पायउतार झाल्यानंतर दोन्ही देशांतील संबंध सुरळीत होऊ शकतात असे इम्रान खान यांनी म्हटले होते. त्याआधी इम्रान खान यांनी २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत मोदी विजयी झाल्यास दोन्ही देशांमध्ये चर्चा होऊ शकते असे म्हटले होते.

दरम्यान, पाकिस्तानने अफगाण शांतता संमेलनाचे आयोजन केले आहे. यामध्ये अफगाणिस्तानमधील अनेक नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. अफगाणिस्तान सरकारच्यावतीने कोण सहभागी होईल, याबाबत काहीही स्पष्ट झाले नाही. तर, तालिबानने या संमेलनात उपस्थित राहण्यास नकार दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या