Ticker

6/Breaking/ticker-posts

Result: CBSE 12th: बारावीचा निकाल जाहीर, SMS, App, IVRS च्या माध्यमातून असा पाहा

 








लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 नवी दिल्ली : CBSE 12th Result: सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. आहे. अधिकृत वेबसाइट cbse.gov.in (cbse.nic.in) निकाल जाहीर होईल. cbseresults.nic.in  या लिंकवर रिझल्ट पाहता येईल. बऱ्याचदा हेवी ट्रॅफीक आणि लोडमुळे सीबीएसई वेबसाइट क्रॅश होते आणि विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो. पण आता अशी काळजी करण्याची गरज नाही.

वेबसाइटव्यतिरिक्त सीबीएसई बारावीचे विद्यार्थी इतर अनेक पद्धतीने निकाल पाहू शकतात. एसएमएस, उमंग अॅप आणि डिजिलॉकरच्या माध्यमातून निकाल पाहता येऊ शकतो.

CBSE 12th Result app: असा पाहा रिझल्ट
उमंग अॅप (Umand App): आपल्या स्मार्टफोनमध्ये गुगल प्ले स्टोरमध्ये जाऊन उमंग अॅप डाऊनलोड करा. अॅपमध्ये रजिस्टर करा. CBSE Result  संबंधित टॅबवर क्लिक केल्यानंतर आपली माहिती भरुन सबमिट करा. रिझल्ट स्क्रिनवर दिसेल. तो डाऊनलोड करा.

CBSE 12th result digilocker: सीबीएसई अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांचा रिझल्ट आणि मार्कशिटसाठी डिजिलॉकरचा वापर करत आहे.  digilocker.gov.in  वर जा. नोंदणी केली असेल तर लॉगिन करा. अन्यथा आधी रजिस्टर करा आणि लॉगिन करा. तुम्हाला रिझल्ट आणि मार्कशिटची लिंक दिसेल.

SMS: सीबीएसईतर्फे दरवर्षी रिझल्ट तपासण्यासाठी एसएमएस आणि आयवीआरएसची सुविधा दिली जाते. एसएमएसद्वारे सीबीएसई बारावीचा निकाल मिळवण्यासाठी मोबाईल मेसेज बॉक्समध्ये CBSE12(स्पेस)(रोल नंबर) (स्पेस) आणि ७७३८२९९८९९ या नंबरवर पाठवावा.

CBSE 12th result IVRS: सीबीएसई बारावी रिझल्टसाठी आयव्हीआरएस रिझल्ट (CBSE Result IVRS)च्या सुविधेचा लाभ घेऊ शकता. यासाठी खाली देण्यात आलेल्या नंबरवर कॉल करावा लागेल. फोनवर कॉम्प्युटराइज्ड आवाज ऐकायला मिळेल. निर्देश मिळाल्यावर आपला रोल नंबर आणि जन्मतारीख टाइप करा. त्यानंतर तुम्हाला रिझल्ट सांगितला जाईल.

दिल्लीच्या विद्यार्थ्यांसाठी नंबर- २४३००६९९
दिल्ली बाहेरील विद्यार्थ्यांसाठी नंबर- ०११-२४३००६९९

बारावीच्या निकालाचा फॉर्म्युला
सीबीएसईने बारावीचा निकाल (CBSE Board Result ) तयार करण्यासाठी मूल्यांकन पद्धतीचा अवलंब केला असून त्यासाठी 13 सदस्यांच्या समितीची निर्मिती केली होती. या पॅनेलच्या वतीने मूल्यमापनाचा 30:30:40 असा फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे. यामध्ये दहावीच्या गुणांचे 30, अकरावीच्या गुणांचे 30 आणि बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाचे 40 टक्के गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावाचा परिणाम दहावी आणि बारावीच्या परीक्षांवर झाला आहे. गेल्या महिन्यात, 24 जूनला सर्वोच्च न्यायालयाने सीबीएससी, सीआयसीएसई आणि देशातील सर्व राज्यांच्या शिक्षण मंडळांना बारावीच्या परीक्षांचा निकाल 31 जुलैपूर्वी लावण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार आज दुपारी निकाल जाहीर करण्यात आला.

प्रवेश प्रक्रिया 30 सप्टेंबरपूर्वी पूर्ण करावी: यूजीसी
बारावीच्या या निकालानंतर महाविद्यालये आपली प्रवेश प्रक्रिया सुरु करु शकतात असं विद्यापीठ अनुदान आयोगाने स्पष्ट केलं आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने महाविद्यालये आणि विद्यापीठांसाठी शैक्षणिक वेळापत्रक जारी केलं आहे. त्यामध्ये महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया ही 30 सप्टेंबरपूर्वी पूर्ण करावी जेणेकरुन 1 ऑक्टोबरपासून नियमित सत्र सुरु केलं जाईल अशा प्रकारचे निर्देश दिले आहेत. 

 

महाराष्ट्र बोर्डचाही बारावीचा निकाल लागण्याची शक्यता
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आज बारावीच्या निकालाची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने देशातील सर्व राज्यांच्या शिक्षण मंडळांना 31 जुलै पर्यंत बारावीच्या परीक्षांचे निकाल लावण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार महाराष्ट्र स्टेट एज्युकेशन बोर्डाकडे आज आणि उद्याचा दिवस आहे. त्यामुळे आज बारावीच्या निकालाची तारीख जाहीर करुन उद्या निकाल लागण्याची जास्त शक्यता आहे.

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या