*'NEET परीक्षेमध्ये
ओबीसी आरक्षण द्या'
*'अन्यथा ओबीसी समाज रस्त्यावर
उतरेल', असा इशारा
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नवी दिल्ली: मागास
वर्ग, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील
व्यक्ती आणि संघटनांनी NEET मध्ये ओबीसी
आरक्षण देण्याची मागणी केली आहे. यावेळच्या
जनगणनेमध्ये जातिनिहाय आकडेवारी देखील एकत्र केली जावी. यामुळे विविध क्षेत्रातील
पात्र समुदायाला आरक्षणाचा योग्य लाभ मिळेल अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली
आहे. या व्यक्ती आणि संघटनांनी 'सोशल रिवॉल्यूशन अलायंस' (एसआरए) बॅनर अंतर्गत
एका संम्मेलनाचे आयोजन केले होते. त्यावेळी यासंबंधी विविध विषयांवर चर्चा करण्यात
आली. मेडिकल प्रवेश परीक्षेमध्ये ओबीसी
आरक्षण निश्चित केले जावे अशी मागणी यावेळी
करण्यात आली.
२०२१ ची जनगणना जातिनिहाय नसेल या सरकारच्या
निर्णयावर आम्ही नाराज आहोत असे या संमेलनात उपस्थितांनी सांगितले. यावेळच्या
जनगणनेला जाती आधारित जनगणनेअंतर्गत घेतले जावे. असे न केल्यास मागास वर्गातील
लोकांकडे आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरणार नाही असे ओबीसी महासभाचे अध्यक्ष
धर्मेंद्र कुशवाह यांनी म्हटले.
नीटच्या परीक्षेमध्ये
ओबीसी आरक्षण निश्चित केले जावे. ओबीसी वर्गाच्या कल्याणासाठी केंद्र स्तरावर
वेगळे मंत्रालय बनवले जावे आणि केंद्री लोकसेवा आयोगाच्या पातळीवर राष्ट्रीय
न्यायिक नियुक्ती आयोग बनवला जावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
नीट यूजी
परीक्षा नोंदणी
राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA)ने नीट यूजी परीक्षा २०२१ च्या
तारखांची घोषणा केली आहे. नीट यूजी २०२१ ची नोंदणी १३ जुलैला सुरु झाली असून ६
ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे. उमेदवार नीट परीक्षा पोर्टल ntaneet.nic.in वर जाऊन नीट यूजी परीक्षा २०२१ साठी अर्ज करु शकतात. दुसरीकडे करोना
प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षात परीक्षेचा अभ्यासक्रम कमी
करण्याची मागणी होतेय. हे पाहता एनटीएने नीट यूजी २०२१ एक्झाम पॅटर्नमध्ये थोडा
बदल केला आहे.
एनटीएने जाहीर केलेल्या
(नीट यूजी)२०२१ माहिती पत्रकामधील टेस्ट पॅटर्ननुसार परीक्षेच्या प्रश्न
पत्रिकेमध्ये दोन सेक्शन असतील. प्रत्येक विषयासाठी दोन सेक्शन असतील. यामधील
सेक्शन ए मध्ये ३५ प्रश्न आणि सेक्शन बी मध्ये १५ प्रश्न असतील. या १५
प्रश्नांमधील कोणतेही १० प्रश्न सोडवण्याचा पर्याय विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
त्यामुळे सर्व विषयांचे दोन सेक्शन मिळून सोडवलेल्या प्रश्नांची संख्या
पहिल्याप्रमाणे समान राहील. प्रत्येक योग्य प्रश्नाच्या उत्तरासाठी ४ गुण असतील.
तर चुकीच्या उत्तराचा एक गुण कापला जाईल.
0 टिप्पण्या