लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
एमपीएससीमार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा आणि रिक्त
पदांच्या भरतीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली
नुकतीच बैठक झाली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. सार्वजनिक
आरोग्य विभाग, वैद्यकीय
शिक्षण विभाग इत्यादी विभागांना पदभरतीच्या निर्बंधांमधून सवलत देण्यात आली आहे.
तसेच गट 'अ'मधील चार हजार ४१७ पदे,
गट 'ब'मधील आठ हजार ३१
पदे आणि गट 'क'मधील तीन हजार ६३ पदे
अशी एकूण १५ हजार ५११ पदे भरण्यास वित्त विभागाने २०१८ पासून मान्यता दिलेली आहे.
त्याअनुषंगाने या पदांचे आरक्षण तपासून पद भरती गतीने राबवण्याच्या दृष्टीने
कार्यवाही सुरू आहे, असे ते म्हणाले.
उमेदवारांच्या मुलाखतीच्या टप्प्यावर प्रलंबित असलेली भरती
प्रक्रिया पार पाडण्याच्या दृष्टीने एमपीएससी सदस्यांची चार रिक्त पदे भरणे गरजेचे आहे. सदस्यांची ही पदे
भरण्यासाठी जुलै अखेरपर्यंत सर्व प्रक्रिया पार पाडण्याबाबतही बैठकीत निर्देश
देण्यात आले. याशिवाय, केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्य संख्येत वाढ करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात
आली. त्यामुळे भविष्यातील मुलाखती गतीने पार पाडता येतील.
संघ लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी) दरवर्षी पुढील
संपूर्ण वर्षाचे परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले जाते. त्याच धर्तीवर
एमपीएससीच्या परीक्षांचेही वेळापत्रक जाहीर करण्याबाबतचे निर्देशही देण्यात आले
आहेत, अशी माहिती भरणे यांनी
यावेळी दिली.
0 टिप्पण्या