* पाथर्डी – शेवगाव पाठोपाठ नेवाशातील कार्यकर्त्यांसह प्रमुख भाजप पदाधिकार्यांचे राजीनामे
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
अहमदनगर : भाजप खासदार डॉ.प्रीतम मुंडे
यांना मंत्रिमंडळ विस्तारात डावलल्याने मुंडे समर्थकांमध्ये टोकाची नाराजी पसरली
आहे. त्याचे तीव्र पडसाद जिल्ह्यात उमटले असून गेले दोन दिवसापासुन सुरु असलेले राजीनामा
सत्र गतिमान झाले आहे. शेवगाव- पाथर्डी पाठोपाठ हे लोण जिल्हाभर पसरले आहे. दरम्यान
काल नेवाशातील ५१ कार्यकर्त्यांनी भाजपा प्राथमिक सदस्यत्वाचे राजीनामे तालुका अध्यक्षांकडे
सुपूर्द केले. पाथर्डीत प्रमुख पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे जिल्हाध्यक्षांकडे सादर केले आहेत. दरम्यान , कार्यकर्त्यांनी माझ्याकडे राजीनामे
दिले आहेत, ते पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर पोहोचतील याबाबत वरिष्ठ
काय तो निर्णय घेतील असे भाजपचे दक्षिण
जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यानी सांगितले.
खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांचा मंत्रीमंडळात
समावेश न केल्यामुळे नेवासा तालुक्यातील 51 कार्यकर्त्यांनी
भाजपा प्राथमिक सदस्यत्वाचे राजीनामे तालुका अध्यक्षांकडे सुपूर्द केल्याची माहिती
लोकनेते गोपिनाथ मुंडे प्रतिष्ठाणचे मुख्य प्रवर्तक राजेंद्र कीर्तने यांनी
दिली. भाजपचे नेवासा तालुका अध्यक्षांना दिलेल्या राजीनामा पत्रात श्री.किर्तने
यांनी म्हंटले आहे की, लोकनेते गोपिनाथ मुंडे प्रतिष्ठाण
भानसहिवरा यांच्य ५१ (एक्कावन्न) सदस्यांनी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा
राजीनामा आपल्याकडे देण्यात येत आहे.
तालुक्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे जिल्ह्याध्यक्ष अरुण मुंडे यांच्याकडे सुपूर्त केले आहे.पाथर्डी येथील शासकीय विश्रामगृहात भाजपच्या पदादाधिकाऱ्याच्या भावना मुंडे यांनी जाणून घेतल्या. भारतीय जनता पार्टीच्या पंचयात समिती सभापती सुनीता गोकुळ दौंड,नगराध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके,भाजपा तालुकध्यक्ष माणिक खेडकर, गोकुळ दौंड,माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड,पंचायत समिती सदस्य विष्णुपंत अकोलकर,जिल्हा उपाध्यक्ष धनंजय बडे,नागनाथ गर्जे, सुनील पाखरे,बाजीराव गर्जे,अभय भंडारी,अंबादास पालवे,युसूफ शेख,आप्पासाहेब शिरसाट,अजित शिरसाट,बाजीराव गर्जे,रामराव खेडकर,सचिन वायकर,बाबूराव बांगर,नारायण पालवे आदींनी राजीनामे दिले आहेत.
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष धनंजय बडे यानीही आपल्या कार्यकर्त्यांसह सामूहिक राजीनामे जिल्हाध्यक्षांकडे सादर केले आहेत.
सभापती सुनीता दौंड,गोकुळ दौंड,जिल्हा युवामोर्चाचे उपाध्यक्ष अमोल गर्जे,सरचिटणीस सचिन पालवे,रणजीत बेळगे,अर्जुन धायतडक यांनी यापूर्वीच पक्षाचे व इतर पदाचे राजीनामे दिले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात खासदार प्रीतमताई मुंडे यांना स्थान न मिळाल्यामुळे तालुक्यातील व जिल्ह्यातील मुंडे समर्थकांमध्ये प्रचंड असंतोष व नाराजी आहे. त्यामुळे मुंडे समर्थक कार्यकर्त्यांनी राजीनामा सत्र सुरू केले आहे. या राजीनाम्यामुळे भाजपला चांगलाच धक्का बसणार आहे.
यावेळी भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे म्हणाले,आज पाथर्डी तालुक्यातील अनेक भाजप कार्यकर्त्यांनी आपल्या पदाचा आणि विविध संस्थावर असलेल्या पदाचा राजीनामा कार्यकर्त्यांनी माझ्याकडे सामूहिकरित्या दिला आहे. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर याबाबत ह्या सगळ्या तीव्र भावना पोहोचणार आहे. वरिष्ठ यावर निर्णय घेतील.
0 टिप्पण्या