Ticker

6/Breaking/ticker-posts

नशीब फळफळले ! तालिबानींच्या हाती सापडले तीन अब्ज रुपयांचे घबाड..


 






 लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

कंदाहार: अमेरिकन सैन्याच्या माघारीनंतर तालिबानने अफगाणिस्तानमध्ये आक्रमक भूमिका घेतली आहे. पाकिस्तान सीमेच्या लगत असलेल्या कंदाहार प्रांतातील स्पिन बोल्डाक भागातील एका सीमा चौकीवर तालिबानने ताबा मिळवला. ही चौकी ताब्यात घेतल्यानंतर तालिबानी दहशतवाद्यांचे नशीब फळफळले. तालिबानींच्या हाती तीन अब्ज पाकिस्तानी रुपये सापडले आहेत. ही रक्कम अफगाण जवान सोडून पळाले.

 तालिबानने एका प्रसिद्धीपत्राद्वारे ही माहिती दिल्याचे वृत्त पाकिस्तानी वृत्तवाहिनी जिओ न्यूजने दिले आहे. तालिबानकडून अफगाणिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर हल्ले सुरू आहेत. अफगाणिस्तानच्या ८५ टक्के भूभागावर ताबा मिळवला असल्याचा दावा तालिबानी नेत्यांनी केला आहे. बुधवारी तालिबानच्या दहशतवाद्यांनी स्पिन बोल्डाकमध्ये तयार करण्यात आलेल्या चौकीवर ताबा मिळवला. अफगाणिस्तानच्या सीमेवरील चौक्यांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न तालिबानकडून सुरू आहे. सीमेवरील चौक्यांवर ताबा मिळवल्यास सीमेतून होणाऱ्या व्यापारातून कमाई करता येईल, असे तालिबानचे मनसुबे आहेत.

तालिबानचा प्रवक्ता जबिउल्लाह मुजाहिदने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले की, तालिबानने कंदाहार प्रांतातील भागावर ताबा मिळवला आहे. स्पिन बोल्डाक आणि चमन तसेच कंदाहार दरम्यानचा हा महत्त्वाचा मार्ग आहे. हा भाग तालिबानकडे आल्यामुळे आता कस्टम विभागावरही तालिबानने ताबा मिळवला आहे. पाकिस्तानच्या सुरक्षा दलानेही याला दुजोरा दिला आहे.

तर, अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने याबाबतची अधिक माहिती घेत असल्याचे सांगितले. तालिबानने या भागातील अफगाणिस्तानचा झेंडा उतरवून आपला झेंडा लावला आहे. अफगाण सुरक्षा दलाच्या जवानांनी तस्करांकडून लाच घेत तीन अब्ज रुपये जमवले होते. त्याचेच घबाड तालिबानच्या हाती लागले असल्याचे पाकिस्तानच्या विश्लेषकांनी म्हटले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या