* राजकारणात काहीही घडू शकते
* संभाव्य भाजप-मनसे युतीबाबतही त्यांनी सूतोवाच
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नाशिक: मनसे जोपर्यंत परप्रांतीयांसंदर्भात
आपले धोरण बदलत नाही, तोपर्यंत त्यांच्याशी युती शक्य नाही.
मात्र, राजकारणात काहीही घडू शकते, असे
सांगतानाच, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरे यांचे नाशिकमध्ये कौतुक
केले.
स्थानिक पातळीवर अॅडजस्टमेंट होत असतात, असे सांगून नाशिकसह आगामी काही
महापालिका निवडणुकांमध्ये संभाव्य भाजप-मनसे युतीबाबतही त्यांनी सूतोवाच केले. राज
ठाकरे महाराष्ट्राला हवं असलेलं नेतृत्व आहे. मात्र, ते एकटे
राज्यात एकहाती सत्ता आणू शकत नाहीत, असे सांगायलाही ते
विसरले नाहीत.
0 टिप्पण्या