Ticker

6/Breaking/ticker-posts

मुख्यमंत्री ठाकरेंसहीत सहा मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान मोदींची चर्चा सुरू

 







लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

नवी दिल्ली : करोनाची दुसरी लाट अद्याप संपुष्टात आली नसतानाच देशाला करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका आहे. याच दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी आज पुन्हा एकदा या धोक्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या हालचाली सुरू केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासहीत सहा मुख्यमंत्र्यासोबत कोविड १९ परिस्थितीवर चर्चा करत आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत या सहा राज्यांत करोना संक्रमणाचा वेग ओसरताना दिसून आलेला नाही. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्वेत्तर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबतही एक बैठक घेतली होती.

या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्यासोबतच तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगन मोहन रेड्डी , कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक तसंच केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन हेदेखील सहभागी झालेत. सकाळी ११.०० वाजता या बैठकीला सुरूवात झालीय.


आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गुरुवारी देशात ३८ हजार ९४९ करोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ३ कोटी १० लाख २६ हजार ८२९ वर पोहचलीय तर गेल्या २४ तासांत करोनामुळे ५४२ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. देशातील मृतांची एकूण संख्या ४ लाख १२ हजार ५३१ वर पोहचलीय. देशात सध्या ४ लाख ३० हजार ४२२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या