Ticker

6/Breaking/ticker-posts

तर.. 'या' जिल्ह्यात पुन्हा कडक लॉकडाऊन?; अधिकाऱ्याने दिला थेट इशारा

 *अहमदनगर जिल्ह्यात कोविड रुग्णसंख्यावाढीमुळे चिंतेत भर.

*विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी घेतली आढावा बैठक.

*रुग्णसंख्या वाढतच राहिली तर पुन्हा कडक निर्बंध लागू करणार.








लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 अहमदनगर: नगर जिल्ह्यातील वाढत्या कोविड रुग्णसंख्येचे नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी गंभीर दखल घेतली आहे. जिल्ह्याची आढावा बैठक घेऊन त्यांनी प्रशासनाला सूचना दिल्या. चाचण्यांची संख्या वाढवा, प्रतिबंधात्मक क्षेत्र जाहीर करून उपाययोजना गतीने राबवा, करोना संसर्गास कारणीभूत ठरणाऱ्या आणि प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्यास टाळाटाळ करणाऱ्या आस्थापना बंद करा, लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊ त्यांना उपाययोजनांची गरज पटवून द्या, अशा सूचना त्यांनी केल्या. एवढे करूनही रुग्णसंख्या वाढतच राहिली तर पुन्हा कडक निर्बंध लागू करावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.

अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा करोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. बरे होणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्याने उपचाराधीन रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे रुग्णालयातील बेड पुन्हा व्यापले जाऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर गमे यांनी आढावा बैठक घेतली. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने रुग्णसंख्येत वाढ होत आहे. या रुग्णवाढीची कारणे शोधून तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे सांगून गमे म्हणाले, जिल्ह्यात गर्दी जमवणाऱ्या कार्यक्रमांवर त्या-त्या क्षेत्रातील प्राधिकरणांमार्फत स्थापन करण्यात आलेल्या पथकांकरवी लक्ष ठेवले गेले पाहिजे. विविध ठिकाणची पथके तात्काळ कार्यरत करा. ठिकठिकाणी नाकाबंदी करा. ज्या आस्थापना कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन करीत नाहीत, त्या सील करा. कोणत्याही प्रकारे करोना संसर्ग पसरण्यास कारणीभूत ठरणाऱ्या घटकांना सवलत देऊ नका. रुग्णसंख्या या प्रमाणात वाढत राहिली तर त्याचा ताण आरोग्य यंत्रणेवर येणार आहे. त्यामुळे हा प्रादुर्भाव वेळीच आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना करा, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी जिल्हा प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. सध्या संगमनेर, पारनेर, पाथर्डी, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शेवगाव या ठिकाणी रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह गुरुवारपासून प्रादुर्भाव वाढलेल्या तालुक्यांचा पुन्हा दौरा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या