लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
औरंगाबाद
: .सिल्लोड मार्केटला पंधरा दिवसांपूर्वी मिरचीला
प्रतिक्विंटल साडेतीन ते चार हजार रुपयांचा भाव होता. मात्र, आवक वाढल्याने दीड ते दोन हजाराने भाव गड़गडले बाजारात
आवक वाढल्याने मिरचीचे भाव दीड ते दोन हजार रुपयांनी गडगडले. आवक वाढल्याने
बाजारात वाहनांच्या रांगा लागत आहेत. यामुळे मिरचीला प्रतिक्विंटल एक हजार ८००
रुपयांचा भाव मिळाल्याने
मिरची उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण
आहे.
तालुक्यात मका,
कपाशी ही दोन पिके प्रामुख्याने घेतली जातात. शेतकरी आता मिरची,
आद्रक, सोयाबीन, हळद अशा
पिकांकडे वळत आहे. गेल्या वर्षी झालेल्या पावसामुले विहिरींना मुबलक पाणी होते.
यामुळे यंदा तब्बल ४ हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी पूर्वहंगामी मिरचीची लागवड केली. त्यासाठी
ठिबक, मल्चिंग पेपर, महागड्या औषधी असा
खर्चही केला. तालुक्यात यंदा रोहिण्या पाठोपाठ मृग नक्षत्राने लवकर हजेरी
लावल्याने मिरचीचे पीक चांगले बहरलेले आहे. मिरची बाजारात येताच चार हजार रुपयांचा
भाव मिळाला. यामुळे शेतकरी समाधानी होते. मात्र, काही दिवसांपासून
मिरचीची आवक चांगलीच वाढली असून भाव मोठ्या प्रमाणात घसरले आहेत.
तालुक्यातील आमठाणा, शिवना, गोळेगाव, पिरोळा फाट्यावर दररोज मिरचीचा बाजार भरतो. या ठिकाणी मिरची खरेदीसाठी
जिल्ह्यासह परराज्यातील व्यापारी येतात. तालुक्यासह शेजारील तालुक्यातील उत्पादक
शेतकरी या बाजारात मिरची घेऊन येतात. यामुळे दुपारी तीन वाजल्यापासून या
बाजारांमध्ये वाहनांच्या रांगा लागतात. त्यात सध्या आवक वाढल्याने वाहनांची तोबा
गर्दी होत असून याचा फायदा व्यापारी घेत असल्याचे चित्र आहे.
0 टिप्पण्या