*भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले.
*ऑक्सिजन अभावी देशात एकही
मृत्यू नाही असे सांगून केंद्र सरकार खोटे बोलत आहे , असे राऊत यांनी म्हटले होते.
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
चित्रा वाघ यांनी आपला एक व्हिडिओ ट्विट करत हे प्रश्न उपस्थित केले आहेत. वाघ आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, 'संजय राऊत यांना शब्द सूचत नाहीत, असं कानावर आलं आहे. केंद्र सरकारने ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू झाला नाही असं उत्तर दिल्याने केंद्रावर खटला भरावा असं संजय राऊत यांचं म्हणणं आहे.
मग
आम्हालाही काही प्रश्न पडलेत, की मे महिन्यामध्ये महाराष्ट्र
सरकारने ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू झाला नाही, असे
प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात दिलेलं आहे. आणि त्यामुळे आता संजय राऊत हे
महाराष्ट्र सरकारवर खटला भरणार आहेत का? आतापर्यंत केंद्र
सरकारला महाराष्ट्र सरकारने ऑक्सिजन अभावी किती मृत्यू झाले, याची माहिती दिली आहे का? किंवा ते आता देणार आहेत
का? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चुकीची माहिती जर
संपादकांना कुणी देत असेल, तर याची जबाबदारी कोणावर निश्चित
करणार?'
0 टिप्पण्या