Ticker

6/Breaking/ticker-posts

कै. श्रीनिवास कनोरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहू

 स्वकुळसाळी हितसंवर्धक मंडळ संचालित शाळेच्या नूतन पदाधिकार्यांचा सत्कार संपन्न ( फोटो- महेश कांबळे)







लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 अहमदनगर- येथे भगवान जिव्हेश्वर विदयापीठ  स्थापन व्हावे    हे कै श्रीनिवास कनोरे यांचे हे स्वप्न होते, मात्र ते अचानक आपल्यातून निघून गेल्यामुळे,त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी शिक्षण कमिटी व आपल्या सर्वांची आहे, त्यासाठी प्रयत्नशील राहू असे प्रतिपादन स्वकुळसाळी हितसंवर्धक मंडळाचे विश्‍वस्त प्रमुख अरविंद धिरडे यांनी केले.

 येथील स्वकुळसाळी हितसंवर्धक मंडळाच्या शालेय शिक्षण समितीचे नूतन पदाधिकारी अध्यक्ष जितेंद्र लांडगे,उपाध्यक्ष मृणाल कन्होरे ,सचिव सुनील पावले व कार्यकारणी सदस्य यांचा एकत्रित सत्कार जागतिक साळी फाऊंडेशनचे संपर्क प्रमुख महेश कांबळे व महाराष्ट्र राज्य स्वकुळ साळी समाज महिला मंडळाच्या राज्य कार्यकारणी सदस्या सौ. अनुजा कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला. 

वर्धापन दिन कार्यक्रमात उपस्थित समाजातर्फे  नगरमधील कल्याणरोडवर श्री लक्ष्मीनारायण शिशु शिक्षण मंदिराच्या संस्कृती कनोरे शैक्षणिक संकुला मध्ये  विविध उपक्रम राबविण्यात आले. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा ही सत्कार करनयात आला. यावेळी स्वकुळसाळी हितसंवर्धक मंडळाचे विश्‍वस्त प्रमुख अरविंद धिरडे,अध्यक्ष सतीश झिकरे,संजय सागावकर,गणेश अष्टेकर,छाया साळी,वनिता पाटेकर,सुरेखा शेकटकर,शुभदा वल्लीआदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

 शाळेला या ठिकाणी कै.श्रीनिवास कनोरे यांनी जागा दिली असून या ठिकाणी भव्य इमारत बांधण्याचा संकल्प आहे,सध्या वर्गासाठी खोल्या बांधण्यात आल्या असून येथे बालवाडी सुरु झाली आहे. कै श्रीनिवास कनोरे यांचे  स्वप्न पूर्ण करण्यासाठी शाळेच्या बांधकामासाठी सर्व समाजातील दानशूरांनी शाळेला मदत करावी असे आवाहन स्वकुळसाळी हितसंवर्धक मंडळाचे विश्‍वस्त प्रमुख अरविंद धिरडे यांनी केले 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या