बीड भाजपच्या ४९ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
* नगरमध्येही अनेकांनी दिले राजीनामे
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
बीड : केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातील ४
खासदारांना संधी देण्यात आली. मात्र, केंद्रीय मंत्रिपदासाठी गेल्या अनेक दिवसांपासून ज्या नावाची चर्चा
होती त्या बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना डावलण्यात आलं. या
मुद्द्यावरून सोशल मीडियावर मुंडे समर्थकांकडून नाराजी व्यक्त केली जात
असतानाच आता थेट भाजप पदाधिकाऱ्यांचं राजीनामा सत्र सुरू झालं आहे. या
पार्श्वभूमिवर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या अॅक्शनमोडमध्ये असल्याचे स्पष्ट होतंय. त्यांच्या आगामी भूमिकेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येत्या मंगळवारी पंकजा मुंडे यांनी
मुंबईत या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. वरळीतील कार्यालयात या बैठकीचं आयोजन
करण्यात आलं असून यावेळी पंकजा मुंडे समर्थकांशी काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष
आहे. खरंतर, आतापर्यंत भाजपच्या बीडमधील ४९ पदाधिकाऱ्यांनी
राजीनामे दिले आहेत. हे लोण नगरसह,पुणे,नाशिक.औरंगाबाद आदी जिल्ह्यात पसरू लागल आहे. त्यामुळे ही भाजपसाठी मोठी चिंतेची बाब ठरत आहे.
मुंडेंचे
समर्थक आक्रमक
'केंद्रीय मंत्रिमंडळात भाजपमधील
आयारामांना संधी देण्यात आली, मग महाराष्ट्रात भाजपचा
विस्तार करण्यात सिंहाचा वाटा असणाऱ्या दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या मुलीचं काय
चुकलं होतं,' असा सवाल करत प्रीतम मुंडे यांच्या
समर्थकांकडून सोशल मीडियावर बोलून दाखवला जात आहे. तसेच सातत्याने भाजपकडून जाणीवपूर्वक डावलल जात असल्याच्या घटनांचे दाखले देऊन संताप व्यक्त केला जातोय. आता थेट पदाधिकाऱ्यांनी
राजीनामा देण्यास सुरुवात केल्याने भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
नगर जिल्ह्यातही
राजीनामा सत्र सुरूच
शेवगाव तालुक्यातील जिल्हा किसान मोर्चा
अध्यक्ष कचरू चोथे व जिल्हा भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस
गणेश कराड यांनी आज पक्षश्रेष्ठींकडे राजीनामे दिले. अहमदनगर जिल्हा दिव्यांग विकास आघाडीचे तालुकाध्यक्ष प्रशांत ढाकणे यांनी भाजपात मुंडे
भगिनी वर सातत्याने होणाऱ्या अन्याच्या निषेधार्थ पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे
सादर केला आहे
पाथर्डी तालुक्यातून राजीनाम्याची जंत्रीच सुरू झाली आहे . पंचायत
समितिच्या सभापती सुनीता दौंड , जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी गोकुळ दौंड , जिल्हा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अमोल
गर्जे ,सरचिटणीस सचिन पालवे , रणजीत बेळगे
, अर्जुन धायतडक यांनी
आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत . तर भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, माजी नगरसेवक
रामनाथ बंग व नगरसेविका रूपाली बंग यांच्या सह अनेक सरपंच,उपसरपंच विविध पदाधिकारी राजिनाम्याच्या तयारीत असल्याचे वृत आहे .
0 टिप्पण्या