Ticker

6/Breaking/ticker-posts

लशीच्या २ डोसमध्ये अंतर ठेवणे कितपत योग्य ?; संशोधनात झाला 'हा' खुलासा



 




लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

लंडन: करोना लशीच्या दोन डोसमध्ये अंतर ठेवण्याबाबत वाद-विवाद सुरू आहेत. भारतात कोविशिल्ड लशीच्या दोन डोसमध्ये ८४ दिवसांचे अंतर ठेवण्यात आले आहे. याआधी चार आठवड्यांचे अंतर होते. लशीच्या दोन डोसमध्ये अंतर ठेवण्याबाबत ब्रिटीश संशोधकांनी मोठा दावा केला आहे. फायजर-बायोएनटेक लशीच्या दोन डोसमध्ये अधिक अंतर ठेवल्यास अॅण्टीबॉडी आणि टी-सेल विकसित रोगप्रतिकारक शक्ती वाढणार असल्याचे त्यांनी म्हटले.

ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या नेतृत्वात बर्मिंघम, न्यू कॅसल, लिव्हरपूल आणि शेफिल्ड विद्यापीठांनी आणि ब्रिटन करोना व्हायरस इम्यूनोलॉजी कंसोर्टियमच्या मदतीने फायजर-बायोएनटेकच्या लशीबाबत सखोल संशोधन करण्यात आले. आरोग्य कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, टी सेल आणि अॅण्टीबॉडीचा स्तर पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये अंतर ठेवले तरी अधिक असल्याचे आढळून आले. जागतिक पातळीवर करण्यात आलेल्या संशोधनानुसार, लशीचे दोन डोस घेण्याच्या दरम्यानच्या काळात करोनापासून बचाव होतो आणि लशीच्या दुसऱ्या डोसची आवश्यकता आहे.

शेफील्ड विद्यापीठाच्या संसर्गजन्य आजाराचे वरिष्ठ चिकित्सा प्रवक्ते आणि प्रमुख संशोधक डॉ. तुषाण डी सिल्वा यांनी सांगितले की, सार्स-सीओव्ही-२ लशीनंतर अॅण्टीबॉडी आणि टी-सेलचे आकलन या संशोधनात करण्यात आले. या संशोधनात ५०३ आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला होता.

ब्रिटनने दोन डोसच्या दरम्यान अधिक कालावधी ठेवण्यास मंजुरी दिली आहे. लशीच्या दोन डोसमध्ये अंतर ठेवल्याने अॅण्टीबॉडीचा स्तर अधिक असतो. मात्र, दोन डोस दरम्यान अधिक वाढलेल्या अंतरामध्ये अॅण्टीबॉडीचा स्तर काहीसा कमी होतो. तर, टी-सेलची क्षमता अधिक वाढते. त्यामुळे करोनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी लशीच्या डोसची आवश्यकता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या